Headlines

लघुउद्योगासाठी 10 हजारांचे बिनव्याजी सहाय्य:घुईखेड व परिसरातील 41 महिलांची निवड, रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम‎




ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःचा लघुउद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नागपुरच्यावतीने मदत करण्यात आली आहे. त्यासाठी घुईखेड व परिसरातील ४१ महिलांची निवड करण्यात आली. या महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. घुईखेडच्या श्रीमती कमलाबाई टावरी इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास निरजा शुकुल, रागिणी साहू, प्रशांत भिलकर, डॉ. रतन बगाडे, निलेश राठी, टिमी बावा, सरपंच वर्षलता हेमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. निवड झालेल्या लाभार्थ्यांमध्ये घुईखेड, जावरा, निमगव्हाण व येरड येथील गरजू व उद्योजक महिलांचा समावेश आहे. या सर्व महिलांना प्रत्येकी १० हजार रूपये बिनव्याजी देण्यात आले. या मदतीमुळे संबंधित महिलांना विविध प्रकारचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रारंभिक भांडवल उपलब्ध झाले आहे. या रकमेमुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत नागपुरच्या श्रीमती कमलाबाई टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. परिसरातील गरजू तसेच उद्योग करण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संस्थाप्रमुख कृष्णकुमार टावरी यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे विविध कौशल्ये असूनही आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा महिलांना बिनव्याजी आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे त्यांना घरगुती उद्योग, खाद्यपदार्थ निर्मिती, शिवणकाम, व्यवसाय, सेवा उद्योग तसेच इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या उपक्रमातून ४१ महिलांना प्रत्येकी १० हजार रूपये याप्रमाणे एकूण ४ लाख १० हजारांचे सहाय्य धनादेशाद्वारे देण्यात आले. कुटुंबांना मिळणार आधार बिनव्याजी स्वरूपातील या मदतीमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. या आधारामुळे त्यांच्या उपजिविकेमध्ये मोठा बदल अपेक्षित असून, भविष्यात कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *