![]()
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे तसेच मोबाइलचा योग्य आणि मर्यादित वापर करावा. आजच्या काळात मोबाइलचा अतिवापर ही विद्यार्थ्यांसमोरील गंभीर समस्या बनत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर केवळ आवश्यक शैक्षणिक व व
.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर विविध विभागांसाठी निवड झालेल्या २४ विद्यार्थी प्रतिनिधींना नियुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची निवड लोकशाही पद्धतीने मतदानाद्वारे करण्यात आली होती. यामध्ये हेड गर्ल म्हणून स्वरा कैलास आढाव तर व्हाइस हेड गर्ल म्हणून जान्हवी पटेल यांची निवड झाली.
मार्गदर्शन करताना डॉ. ए. जी. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मिळालेली नेतृत्वाची संधी ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन केले. जीवनात शिस्त बाळगावी, आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि स्वतःसोबत इतरांमध्येही नेतृत्वगुण विकसित करावेत, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थी परिषद ही केवळ पद किंवा अधिकाराचे प्रतीक नसून नेतृत्व, जबाबदारी, शिस्त, संघभावना आणि लोकशाही मूल्ये आत्मसात करण्याची संधी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, समस्या सोडविण्याची क्षमता, संघाकडून प्रभावीपणे काम करून घेण्याची कला आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्याची संधी मिळेल. हीच कौशल्ये त्यांच्या भावी करिअरला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देतील, असे डॉ. मनाली कोल्हे यांनी सांगितले.