![]()
श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची देव दर्शनासाठी वर्दळ सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादे
.
भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली. अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचे व्रत करून मंदिरात येत महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने पहिल्या सोमवारला मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही भाविकांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून महादेवाची आराधना केली. मंदिर परिसरात विविध धार्मिक साहित्य व पूजेचे साहित्य घेण्यासाठीही भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, माजी अध्यक्ष साहेबराव निधाने तसेच ट्रस्टचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.
नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व गावकऱ्यांनी मदत केली आहे. तसेच या ट्रस्टचा क वर्ग मध्ये सामावेश झाल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. श्री वीरभद्र देवालयाच्यावतीने तिसऱ्या सोमवारी श्री रुद्रपूजा व साबुदाणा खिचडीचा महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे. तरी या रुद्रपूजा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले.
भाविकांच्या गर्दीने मंदीराचा परिसर फुलला मंदिर परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले. दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहिल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रावण महिन्यातील पुढील सोमवारनिमित्तही श्री वीरभद्रेश्वर महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.