Headlines

पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद:किरकोळ वादातून हडपसरमध्ये डॉक्टर तर विमाननगरमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल




पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. हडपसरमध्ये एका मोटारचालक डॉक्टरला टोळक्याने मारहाण केली, तर विमाननगर येथील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात डॉ. आवेश नासीर खान (वय 35, रा. एमरल्ड काऊंटी, कोंढवा) यांना मारहाण करण्यात आली. डॉ. खान हे उंड्री परिसरातील पेट्रोल पंपावर जात असताना आरोपींनी दुचाकी आडवी लावून त्यांची मोटार थांबवली. “मोटार जोरात का चालवितो?” अशी विचारणा करत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी रस्त्यात पडलेला दगड डॉ. खान यांना फेकून मारला आणि त्यांच्या हातातील कठीण वस्तूनेही मारहाण केली. या प्रकरणी यश जावळे, आल्हाट, अलकुंटे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गायत्री बैरागी पुढील तपास करत आहेत. वस्तीगृह समोर विद्यार्थ्यांना मारहाण दुसऱ्या घटनेत, विमाननगर भागातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वसतिगृहातील दोन विद्यार्थी जेवणानंतर शतपावली करत असताना ही घटना घडली. आरोपी ओंकार सतीश घाडगे (वय 19, रा. जयजवाननगर, येरवडा) आणि रूबेन रिचर्ड कदम (वय 20, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी विद्यार्थ्यांना अडवून “इंग्लिशमध्ये शिवीगाळ का केली?” अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना मारहाण करून सिमेंटचा गट्टू फेकून मारला. आरोपी वसतिगृहात शिरले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी देत दहशत माजवली. या प्रकरणी वसतिगृहाचे पर्यवेक्षक राकेश कैलास घरडे (वय 52, रा. बलवार आळी, गुरुवार पेठ) यांनी विमानतळपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *