![]()
स्वातंत्र्याच्या 80 वर्षात शाळांमधून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देऊ शकलो नाही हे दुर्देव असून एकीकडे हि परिस्थती असतांना दुसरीकडे विदेशात जाऊन मोठ्या गप्पा मारणे योग्य नाही, आता शाळांमधून सुधारणा करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे अन्यथा त्याची परिणाम भोगावे लागतील असा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीप दिपके यांनी मंगळवारी ता. 18 सत्ताधाऱ्यांना दिला आहे. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रश्नावर गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 18 सुरु केलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी बोलतांना दिपके म्हणाले की, राज्यात शाळांमधून गंभीर समस्या आहेत. स्कुल ठिक करो अभियानांतून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. कुठे विद्यार्थ्याना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, बेंच नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शआळेत शिक्षकांची संख्या कमी आहे, स्वच्छतागृह नाहीत या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेणार तरी कसे असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांची मुले खाजगी शाळांमधून शिक्षण घेतात तर गोरगरीबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. या शाळांमधील सुविधांकडे लक्ष देण्याचे अधिकाऱ्यांचे काम नाही का असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी त्यांची मुले जिल्हा परिषद शाळांमधेच प्रवेशीत केली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे आपण विश्वगुरुच्या गप्पा मारत आहोत अन दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देता येत नसेल तर यापेक्षा मोठे दुर्देव काय आहे. उगीच बाहेर देशात जाऊन मोठ्या गप्पा मारणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सोयी सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजेत. जाहिरात बाजी व इतर कार्यक्रमांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्या ऐवजी हा खर्च शाळांच्या दुरुस्तीवर केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील बहुतांश शाळांमधून शिक्षकांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे आता तातडीने शिक्षकांची भरती केल्यास शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध होऊ शकतील शिवाय बेरोजगारीही कमी होईल. मात्र सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांना आमचे मते हवी असली तर त्यांनी आधा शाळांमधून सुधारणा कराव्यात अन्यथा आम्ही त्यांना मतदान करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनानंतर मिळाले शिक्षक लिंबाळा येथील पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळेत पाच वर्गासाठी दोनच शिक्षक होते. वाढीव शिक्षकांच्या मागणीसाठी गावकऱ्यांच्या आंदोलनात दिपके यांनी सहभाग घेतला. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तातडीने एका शिक्षकाची नियुक्ती केली तर एक शिक्षक पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Source link
स्वातंत्र्याच्या 80 वर्षात विद्यार्थ्यांना पाणी देऊ शकलो नाही हे दुर्दैव:कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा