Headlines

लोहार समाजाच्या एकाच मंचावर गुणवत्ता, नेतृत्व अन् समाजजोड:लोहार युथ फाऊंडेशनतर्फे; गुणवंतांचा सन्मान, 12 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती‎



लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा राहुरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान अन् नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कार्

.

अध्यक्षस्थानी राहुरीचे माजी नगराध्यक्ष दशरथ पोपळघट होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, महासंघाचे शांताराम लोखंडे, नायब तहसीलदार राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता दीपक आगळे आदी उपस्थित होते. फाऊंडेशनचे राज्याध्यक्ष किशोर सोनवणे, कार्याध्यक्ष अजय खंडागळे, उपाध्यक्ष नितेश लोखंडे, सचिव संजय इघे, उद्योजक अमोल जवणे, विजय हरिहर, सागर आगळे, दत्तात्रय पोपळघट, विनायक गाडेकर, सुनीता गाडेकर, विजय हरिहर, उज्वला जवणे आदी उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी प्रास्ताविकात युवा, तरुण, महिला आणि ज्येष्ठांनी वयाचे बंधन न ठेवता फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे. समाजाची पुढील पिढी घडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन केले. तर नायब तहसीलदार राजेंद्र लाड यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्तम कामगिरी करत एमपीएससी, यूपीएससी व राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या पदांवर पोहोचून समाजासाठी योगदान द्यावे, असे सांगितले.

कार्यक्रमात उद्योगश्री, माय-माऊली, शिक्षणश्री, विशेष सेवा पुरस्कार तसेच कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर दहावी, बारावी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमात लोहार युथ फाऊंडेशनच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दादासाहेब आगळे यांची नगर-दक्षिण जिल्हाप्रमुख, अतिश हरेल यांची नगर-उत्तर जिल्हाप्रमुख, वैशाली थोरात यांची नगर-उत्तर महिला जिल्हाप्रमुख, आरती थोरात यांची नगर-दक्षिण महिला जिल्हाप्रमुख, संतोष पोपळघट यांची नगर-उत्तर संघटक, अर्जुन रणसिंग यांची नगर-उत्तर शिक्षणप्रमुख आणि आदिनाथ कौसे यांची जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमोल रणसिंग यांची राहुरी तालुकाप्रमुख, विलास थोरात यांची राहुरी शिक्षणप्रमुख, रोहन गाडेकर यांची राहुरी संघटक, नीलेश नन्नवरे यांची राहुरी संपर्कप्रमुख आणि अरुण इघे यांची राहुरी प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. सूत्रसंचालन संजय इघे व विलास थोरात यांनी, तर आभार अतिश हरेल यांनी मानले.

जानेवारीत श्रीरामपुरात वधू-वर संवाद मेळावा जानेवारी २०२७ मध्ये श्रीरामपूर येथे लोहार समाजाचा वधू-वर संवाद मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या वतीने कै. भागवत तुकाराम लोखंडे व कै. पार्वतीबाई भागवत लोखंडे (टाकळीभान) यांच्या स्मरणार्थ या मेळाव्यात अन्नदान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *