Headlines

पार्किंग ते पर्यटन… कोपरगावच्या विकासाचा ‘अजेंडा’ ठरला!:व्हिजन कोपरगावच्या संवादात बाजारपेठ, रस्ते, पाणी, मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर उपाययोजनांची चर्चा‎



शहरासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत समंस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्हिजन कोपरगाव मंचाच्या पुढाकाराने ‘संवादातून सुविधेकडे’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई बँक्वेट हॉल येथे करण्यात आले. सुशिक्षित वर्ग, उद्योजक, डॉ

.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बाजारपेठेच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. अशोक कोठारी, संजय बंब, संजय भन्साळी, सुधीर डागा, नितीन भुसारे व दीपक विसपुते यांनी विविध मुद्दे मांडले. दुसऱ्या सत्रात पायाभूत सुविधांवर चर्चा झाली. डॉ. डी.एस. मुळे, राजेश ठोळे, डॉ. राजेंद्र श्रीमाळी, प्रसाद नाईक, संतोष भट्टड, प्रा. रियाज शेख व प्रा. वृंदा कोऱ्हाळकर यांनी सहभाग घेतला.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था, मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्त रस्ते, मोकाट जनावरांचा प्रश्न, दर्जेदार रस्ते बांधकाम, नवीन उद्योगांना चालना, युवा व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि पर्यटन सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा नियमित करणे, ड्रेनेजची दुरुस्ती व स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली.

आमदार विवेक कोल्हे यांनी नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने ठोस उपाययोजना करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे सांगितले. चार महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये पुन्हा संवाद कार्यक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्यांच्या कामांना विलंब होत असून, पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद गोशाळा उभारत असल्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *