Headlines

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा ब्रेक:मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता




महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कोकणातील बहुतांश भागांत आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी सरीही कोसळू शकतात. मात्र, सध्या कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवस या भागात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होऊ शकतो. मात्र, अनेक भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. सोलापुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसाची उघडीपही राहू शकते. सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात चार जिल्ह्यांना यलो अलर्ट छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका ते मध्यम वादळी पाऊस होऊ शकतो. तर जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. गोंदियात जोरदार पावसाची शक्यता विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. राज्यातील बहुतांश भागांत उघडीप एकूणच, आज राज्यातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असली तरी काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘थांबला पाऊस, उजळे आकाश…’ श्रावणात रंगला ऊन-पावसाचा खेळ ‘थांबला पाऊस, उजळे आकाश, सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश…’ ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या काव्यपंक्तींची अनुभूती छत्रपती संभाजीनगरवासीयांना मंगळवारी आली…. आषाढ सरला. श्रावणाचा महिना सुरू झाला. ढगांची गर्दी विरळ झालेली. मग अचानक त्यांची गर्दी होते. पावसाची एखादी सर शहरभर पसरते. काही मिनिटांत पाऊस थांबतो. ढगांआडून उन्हाचा कवडसा धरणीवर येतो. किरणांच्या वाटेत ढगांचे काही तुकडे येतात. मग सुरू होतो ऊन-सावलीचा खेळ… मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात सकाळी पावसानं हजेरी लावली. आभाळ दाटून आलेलं. दिवसभर रिमझिम मुक्कामी राहील असं वाटणारा अंधार दाटलेला. अर्ध्या-पाऊण तासात रिमझिम थांबली. काही वेळानं ढगांची पांगापांग झाली. कुठं ऊन पडलं, तर कुठं सावली. दिवसभर पाठशिवणीचा हा खेळ सुरू होता. उपग्रह नकाशात पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती UPच्या 25 शहरांत पाऊस, घरांसह रुग्णालयांत पुराचे पाणी: बंगालच्या आसनसोलमध्ये पूर; राजस्थान, दिल्लीसह 14 राज्यांना अलर्ट उत्तर भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने मंगळवारी राजस्थान आणि दिल्लीसह १४ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज पुढे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील २५ शहरांमध्ये मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागांत रस्ते आणि रुग्णालयांमध्ये पाणी साचले असून, कार आणि दुचाकी पाण्याखाली गेल्या आहेत. कानपूर आणि उन्नावमधील ५०० हून अधिक घरांमध्ये, तसेच प्रतापगडमधील एका पोलीस ठाण्यात पाणी शिरले आहे. आठ जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वाराणसीमधील १०० हून अधिक लहान मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *