मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुल
.
सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एजन्सी
प्रस्तावानुसार, महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमांसह बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केली जाणार आहे. यासाठी ‘रनटाइम सोल्युशन’ या एजन्सीची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या सेवेसाठी दरमहा सुमारे 2.09 लाख रुपये, तर दररोज जवळपास 6,900 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पालिकेच्या विद्यमान यंत्रणेवर प्रश्न
महापालिकेकडे जनसंपर्क विभाग आणि सोशल मीडिया यंत्रणा आधीपासूनच असताना स्वतंत्र एजन्सीची गरज का भासली, यावरून चर्चा सुरू झाली आहे. महापौरांच्या जनसंपर्कासाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदांवरही टीका झाली होती. आता सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी नव्या प्रस्तावामुळे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
मनसेकडून खर्चावर आक्षेप
या प्रस्तावावर मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेने नागरिकांच्या पैशांचा वापर रस्ते, रुग्णालये, शाळा, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी करावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी प्रस्तावित खर्चावरून आगामी काळात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा..
जुन्नर हादरले: पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सविस्तर वाचा
राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा ब्रेक: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सविस्तर वाचा