![]()
तालुक्यातील आढळा खोऱ्यातील धांबोडी फाटा येथे २६ जुलै रोजी सचिन किसन वाकचौरे (३६) यांची झालेली हत्या आणि त्यानंतर मृतदेह पिंपळगावखांड धरणात फेकल्याच्या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असली, तरी खरे
.
ग्रामस्थांनी धांबोडी फाट्यावर सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अवैध धंद्याला कोणाचा वरदहस्त आहे? उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेकडून कारवाई का होत नाही? या व्यवसायामुळेच हत्येची पार्श्वभूमी तयार झाली का, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींचे कॉल डिटेल्स, सोशल मीडिया बॅकअप आणि बँक खात्यांची तपासणी केल्यास आणखी नावे समोर येऊ शकतात, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये पिंपळगाव निपाणी येथील संटूआई देवस्थानचे अध्यक्ष व ग्राम सुरक्षा रक्षक यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या तपासाबाबतही ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला.
दरम्यान, अवैध दारू दुकाने व खाणपट्ट्यांबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २५ ऑगस्टपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.