![]()
बार्शी तालुक्यातील वैराग तालुका निर्मिती, अप्पर तहसील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, नगरपंचायत नवीन कार्यालयाची मागणी आणि वैराग भागाच्या विकासाला गती देण्याच्या निर्धाराने वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी मंगळवारी
.
निरंजन भूमकर यांनी आजोबा धन्यकुमार भूमकर यांचा काँग्रेस विचारधारेचा वारसा पुढे नेत राजकारणात सक्रिय प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वैराग भागातील धुरा सांभाळत सरपंच, पंचायत समिती सदस्य यांसह विविध पदांवर काम केले. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून बार्शी विधानसभाही लढवली. त्यानंतर वैराग नगरपंचायत निवडणुकीत १३ नगरसेवक निवडून आणत सत्ता काबिज केली. उपनगराध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. त्यांच्यासह स्वीकृत दोन असे १५ नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला.
भूमकर यांनी आता वैराग तालुका निर्मिती, अप्पर तहसील तसेच बंद असलेल्या संतनाथ कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश केला.
वैराग तालुका निर्मिती आणि वैराग परिसराला उजनीचे पाणी मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार (कै.) चंद्रकांत निंबाळकर यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता निंबाळकर यांच्यानंतर निरंजन भूमकर यांच्या रूपाने वैराग तालुका निर्मितीच्या मागणीसाठी शिवसेनेत प्रवेशाची पुनरावृत्ती झाली आहे.
पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी आषाढी एकादशीच्या अगोदरच शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दुधनीच्या नगराध्यक्षांनीही शिंदेसेनेला पसंदी दिली आहे. नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने सेनेत ओढा अधिक आहे.
आमदार सोपल गटातील नगरसेवकही येणार या वेळी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी वैराग परिसरात शिंदेसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आमदार दिलीप सोपल यांच्या गटातील काही नगरसेवकांचाही लवकरच शिंदे सेनेत जाहीर प्रवेश होईल.