जुन्नरमध्ये जी अत्याचाराची घटना घडली आहे, ती सत्ताधारी स्थानिक आमदारांच्या गावात घडली आहे. त्यांच्या गावातच जर अशा घटना घडत असतील, तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती खालावली आहे हेच यातून सिद्ध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदच
.
रोहित पवार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही अनेकदा उपस्थित केला आहे. या विषयावर आम्ही अधिवेशनात बोललो, आंदोलने केली. ज्या मुलींवर अत्याचार झाले आणि ज्यांची हत्या झाली, त्यांच्या परिवाराला याची खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. आम्ही या पीडित कुटुंबांची भेट घेतली आहे. सरकारसमोर आम्ही काही आकडेवारी मांडत असून, शक्ती कायद्यासारखा कडक कायदा आणण्याची मागणी करत आहोत. परंतु दुर्दैवाने, राज्याचे गृहमंत्री हे केवळ शब्दांचे खेळ करत आहेत.

गृहमंत्री विषयावरील दुसरीकडे वळवतात
रोहित पवार पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र हे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पुढे जात आहे, त्यावेळी ते आकडेवारीचा खेळ करत मूळ विषयावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कमकुवत झाली आहे.
व्हीआयपी सुरक्षेमुळे सामान्य मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न
रोहित पवार म्हणाले की, सध्या गुन्हेगारांमधील पोलिसांची भीती कमी झाली आहे. पोलिसांचा वापर केवळ आमदार, खासदार आणि व्हीआयपी लोकांना सुरक्षा देण्यासाठीच केला जात आहे. त्यामुळे सामान्य घरातील मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे ही वृत्त वाचा जुन्नर हादरले:पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाचा सविस्तर