Headlines

अवैध जुगार अड्ड्याची माहिती दडवणे पडले महाग:बळसोंडच्या पोलिस पाटील शिखरे 1 महिन्यासाठी निलंबित, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय




बळसोंड परिसरात सुरु असलेल्या अवैध जुगाराची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना न दिल्याच्या आरोपावरून बळसोंडच्या पोलिस पाटील यांना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नुकतेच काढले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत बळसोंड गावालगत अकोला बायपास ते गारमाळ जाणाऱ्या मार्गावर मोकळ्या जागेत टाईम बाजार नावाचा जुगार खेळला जात होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने ता. 31 जुलै रोजी त्या ठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिस विभागाने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे ता. 12 ऑगस्ट रोजी सविस्तर अहवाल सादर केला होता. यामध्ये पोलिस पाटील रत्नमाला शिखरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय सुरु असल्याची व कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्या जात असल्याची माहिती तातडीने पोलिसांना देणे अपेक्षीत आहे. मात्र त्यांनी सदर माहिती दिली नसल्याचे अहवालात नमुद केले आहे. या अहवालावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी तातडीने आदेश काढले आहेत. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असतांना आपल्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास संबंधित पोलिस यंत्रणेला आवश्‍यक ते सहकार्य करणे तसेच आपल्या निदर्शनास येणाऱ्या अवैध व्यवसायाचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृत्यांची माहिती पोलिस अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत देणे अपेक्षीत आहे. मात्र पोलिस विभागाच्या अहवालावरून त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध जुगार सुरु असल्याची कोणतीही माहिती त्यांनी पोलिस ठाणे किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस पाटील शिखरे यांना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *