![]()
आश्रम शाळेंच्या परिस्थितीबद्दल मी स्वत विधींमंडळात चर्चा केली असून मंत्री अतूल सावे यांनी मला शब्द दिला आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. पण त्या गोष्टीला एक महिना झाला असून आता अतूल सावे यांच्यावरच हक्कभंग सादर करावा लागेल अशी परिस्थिती आमच्यावर आली आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नाही, सत्तेत राहुन आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये
असे शिवसेना नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू म्हणाले की, जाती पातीच्या राजकारणात अशा प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. मी पुन्हा एकदा माध्यमांच्या माध्यमातून अतूल सावेंना विनंती करतो की दिव्यागांचे मानधन, वस्तीगृह, शाळा हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवा. अजित पवार असताना ते सांगत होते की 5 तारखेच्या आत जर मानधन झाले नाही तर मी वित्त सचिवाचे मानधन करणार नाही. अजित पवार गेले आणि शब्दही गेला. आता कोणी शब्द देणारा मंत्री भेटतो का हे आम्ही शोधतो आहोत. संघटना कुटुंबापर्यंत मर्यादित नसते बच्चू कडू म्हणाले की,कोणतीही संघटना एका माणसाच्या कुटुंबापुरती मर्यादित नसते. अनेक लोकांनी त्यासाठी त्याग केलेला असतो हे उद्धव ठाकरे यांना समजत असेल. शिवसेना प्रहारमध्ये विलीन करण्याची वेळच येणार नाही. शिवसेना, शिवसेनेतले वाघही कायम राहतील. निकाल आमच्याच बाजूने लागेल बच्चू कडू म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि चिन्हांचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूनेच लागेल आणि नाही लागला तरी एकनाथ शिंदे सक्षम आहेत. केवळ नाव आणि चिन्हावर सर्व काही होत नसते त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. कडक कायदा करण्याची गरज बच्चू कडू म्हणाले की, राज्यात काही गोष्टीबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. जर अत्याचारासारख्या घटना वारंवार घडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे. या घटना कशा रोखता येतील यासाठी प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. तर झालेल्या घटनेप्रकरणी तातडीने शिक्षा देण्यासाठी तातडीने कारवाई करण्यासाठी नवीन कायदे आणले गेले पाहिजे.
Source link
महिन्यानंतरही आश्वासनांची पूर्तता नाही:आश्रमशाळा-दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास मंत्री सावेंवर हक्कभंग आणावा लागेल- बच्चू कडू