Headlines

Ashok Saraf Nagpur Felicitation; Devendra Fadnavis Honors Superstar


महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपुरात त्यांच्या नागरी सत्काराचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. अशोक सराफ

.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या अभिनयात अत्यंत सहजता असून कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय तन्मयतेने साकारली. मराठी माणूस हा नेहमी वास्तवात जगणारा आहे. त्यामुळे अशोक सराफ यांनी पडद्यावर साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले आणि याच कारणामुळे अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनातील ‘सुपरस्टार’ ठरले आहेत.

रंगभूमीपासून हिंदी चित्रपटांपर्यंत वेगळा ठसा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काळाच्या ओघात हास्यरस आणि त्याची शैली बदलत गेली, मात्र या बदलत्या प्रवाहाला एक वेगळे वळण देण्याचे महत्त्वपूर्ण काम सराफ यांनी केले. दूरदर्शनवरील ‘हम पाँच’सारख्या लोकप्रिय मालिकेतून सहजतेने विनोद निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य अवघ्या देशाने पाहिले. त्यांनी केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवला. नाटकांच्या माध्यमातून त्यांनी प्रदीर्घ काळ रंगभूमीची अखंड सेवा केली आहे. ते केवळ एक उत्तम कलावंतच नाहीत, तर एक अत्यंत गुणी आणि संवेदनशील माणूस आहेत.

कुठे थांबायचे हे कळले पाहिजे- अशोक सराफ

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, मला आयुष्यात फारसा संघर्ष करावा लागला नाही. मी प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि रसिक प्रेक्षकांना ते आवडत गेले. अभिनयात, विशेषतः विनोदात काय करायचे आणि कुठे थांबायचे याचे भान असले पाहिजे. विनोदाचा अतिरेक होता कामा नये. पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रत्येक पात्र प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण असते. मात्र, एकदा ते चांगल्या रीतीने जमले की मग सोपे वाटू लागते. आजवर मी शेकडो नाटके आणि प्रयोग केले असले, तरी आजही प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मंचावर प्रवेश करताना मनात थोडी धास्ती आणि उत्सुकता असतेच.

या सोहळ्यास नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र बोरकर, माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे ही वृत्त वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या ‘प्रीती’चा पुनर्विवाह:कोरोना काळात स्वीकारले होते 300 कुटुंबांचे पालकत्व, काँग्रेसवरही डागली तोफ!

“कोरोना हा काळ एका भीषण संकटाचा होता. त्यावेळी अनेकांनी कर्ता पुरुष गमावला. अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांचे पालकत्व आम्ही स्वीकारले होते, आणि आज त्यातील एका एकल मातेचा, ‘प्रीती’चा पुनर्विवाह होत आहे, याचा मला अत्यंत मनस्वी आनंद आणि समाधान आहे,” अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केल्या. प्रीती आकडे हिच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांनी नववधू-वराला आशीर्वाद दिले आणि त्यानंतर माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.