![]()
नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, काल रात्री मनीष नगर परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मनीष नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर, तिच्यासोबत असलेला तरुणही अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत सापडला आहे. नेमके काय घडले? पोलिसांनी आणि हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शिवानी गजभिये (वय २८) आणि किरण आत्राम या दोघांनी काल संध्याकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते. मात्र, रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या खोलीतून अचानक एका मुलीच्या जोरजोरात किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या खोलीकडे धाव घेतली आणि दरवाजा उघडून पाहिले. आतले दृश्य अत्यंत हादरवणारे होते. शिवानी मृतावस्थेत पडलेली होती, तर किरण हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आणि तपास घटनेची माहिती मिळताच मनीष नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून खोलीतून एक चाकू जप्त केला आहे. या दोघांमध्ये रात्रीच्या वेळी कोणत्यातरी कारणावरून मोठा वाद झाला असावा. या वादातूनच संतापाच्या भरात किरणने शिवानीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या किरण आत्राम हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांना अद्याप त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. तो शुद्धीवर आल्यानंतरच या हत्याकांडामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, अशी पोलिसांची माहिती आहे. वर्ध्यात अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा गळा आवळून खून: मृतदेह शेतात फेकला दुसरीकडे, वर्ध्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गावालगतच्या शेतात फेकून दिला होता. ही घटना मंगळवारी (18 ऑगस्ट) उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष पांडुरंग कैकाडे (वय 42, रा. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. हेही वाचा.. नाशिकमध्ये व्हिडीओ शूटिंगचा वाद विकोपाला:तरुणावर कोयत्याने वार करून गच्चीवरून फेकले, हत्याप्रकरणी 3 आरोपींना 4 तासांत बेड्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून, त्याला दुमजली इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) पहाटे विल्होळी येथे उघडकीस आला. राहुल संजय सरकटे (वय 30, रा. संघर्षनगर, विल्होळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तीन संशयितांना अवघ्या चार तासांत अटक केली. सविस्तर वाचा
Source link
नागपूरच्या हॉटेलमध्ये थरार:तरुणीची निर्घृण हत्या, तर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?