वर्ध्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गावालगतच्या
.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष कैकाडे यांच्या पत्नीचे गावातीलच शुभम कैकाडे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 16 ऑगस्टच्या रात्री संतोष कैकाडे हे गावातील भजनाचा कार्यक्रम संपवून घरी परत आले. त्यावेळी त्यांना पत्नी सपना आणि प्रियकर शुभम हे दोघेही घरात आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. आपले अनैतिक संबंध उघडकीस आल्यामुळे आणि यात पती अडसर ठरत असल्याने पत्नी सपना व प्रियकर शुभम यांनी मिळून संतोष यांच्या हत्येचा कट रचला.
गळा आवळून हत्या; मृतदेह शेतात फेकला
सपना आणि शुभमने घरातच संतोष यांचा गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर ही घटना कोणाच्याही लक्षात येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, यासाठी प्रियकर शुभमने आपल्या साथीदारांच्या मदतीने संतोष यांचा मृतदेह उचलून गावाजवळील शेतात फेकून दिला.
असा उघडकीस आला प्रकार
संतोष कैकाडे हे गेल्या तीन दिवसांपासून गावात कुठेही दिसत नसल्यामुळे गावकऱ्यांना आधीच संशय आला होता. दरम्यान, मंगळवारी खुद्द पत्नीनेच पतीचा मृतदेह गावाबाहेरील शेतात पडून असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास चक्रे वेगाने फिरवली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पत्नीसह चौघांना अटक
या प्रकरणी वडनेर पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नी सपना कैकाडे, प्रियकर शुभम कैकाडे याच्यासह सचिन बसूने आणि प्रशांत करपे अशा चौघांना अटक केली आहे.
हे ही वृत्त वाचा
जुन्नर हादरले: पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सविस्तर वाचा नाशिकमध्ये व्हिडीओ शूटिंगचा वाद विकोपाला:तरुणावर कोयत्याने वार करून गच्चीवरून फेकले, हत्याप्रकरणी 3 आरोपींना 4 तासांत बेड्या

मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून, त्याला दुमजली इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) पहाटे विल्होळी येथे उघडकीस आला. राहुल संजय सरकटे (वय 30, रा. संघर्षनगर, विल्होळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर तालुका पोलिसांनी तीन संशयितांना अवघ्या चार तासांत अटक केली. वाचा सविस्तर