![]()
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजता पेठ तालुक्यातील काही भागात जमीन हादरल्याचे जाणवले. अचानक धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गोंदे ते एकदरेपर्यंत परिसराला हादरे मिळालेल्या माहितीनुसार, गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक कामासाठी घराबाहेर पडत होते. त्याचवेळी अचानक हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. महिनाभरात वारंवार धक्के नाशिक जिल्ह्यात मागील महिनाभरात 8 ते 9 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार जाणवणाऱ्या या हादऱ्यांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चिंता वाढली आहे. प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सोमावरीही भूकंपाचे 2 धक्के, पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टरचा धक्का बसला नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात धक्क्यांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ६ मिनिटे ४३ सेकंदांनी २.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र अक्षांश २०.४५७ व रेखांश ७३.६९१ येथे, तर खोली ५ किलोमीटर होती. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ३१ सेकंदांनी ३.२ रिश्टर क्षमतेचा दुसरा धक्का नोंदवण्यात आला. भूकंपांची मालिका; केंद्राचे पथक अन् प्रशासनाचे लक्ष जिल्ह्यात वारंवार धक्क्यांचे कारण शोधण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय पथकही नाशिकमध्ये आले होते. त्याने पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि मालेगाव या भागामध्ये भूकंपाच्या अद्ययावत आणि अचूक नोंदीसाठीचे आधुनिक यंत्रही बसवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. हेही वाचा.. जुन्नर हादरले: चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (18 ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिवसभर तिचा सर्वत्र शोध घेतला. मुलगी सापडत नसल्याने शेवटी कुटुंबीयांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली. सविस्तर वाचा
Source link
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच:पेठ तालुक्यात पुन्हा सौम्य हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण