Headlines

Ashwini Bhide Accuses SRA Mumbai Of Violating Rules


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कारभारावर आता थेट मुंबई महापालिकेकडूनच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला थेट पत्र पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कारभार

.

नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आपल्या अधिकारांचा मोठा गैरवापर केला जात असल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी पत्रात केला आहे. झोपडपट्टी नसलेल्या मोकळ्या भूखंडांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली ‘एसआरए’कडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून, प्राधिकरणाच्या या मनमानी कारभारामुळे मुंबई महापालिकेच्या महसुलावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

विकास नियंत्रण नियमावलीतील नियम 33(10) नुसार प्रत्यक्ष झोपडपट्टी असलेल्या क्षेत्राचा पुनर्विकास केला जातो, तर मोकळ्या भूखंडांच्या पुनर्विकासासाठी नियम 33(11) लागू होतो. एसआरए योजनांतर्गत विकासकांना अधिमूल्यात मोठी सवलत दिली जाते. मात्र, नियमानुसार 33(11) अंतर्गत येणाऱ्या मोकळ्या भूखंडांच्या योजनांना ही सवलत लागू होत नाही. तरीही एसआरए प्राधिकरणाकडून या योजनांनाही सवलतीचा बेकायदेशीर लाभ दिला जात असल्याचा मुख्य आक्षेप महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे सुमारे 300 योजना बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.

पूर्वीचे आदेश अन् पालिकेची नवी मागणी

यापूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने स्पष्ट आदेश जारी करून 33(11) नियमावली एसआरए योजनांसोबत जोडता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, नगरविकास विभागाच्या या आदेशाचे एसआरएकडून तंतोतंत पालन केले जात नसल्याचे विद्यमान आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

एसआरएच्या या कारभारामुळे मुंबई महापालिकेच्या नगरनियोजन विभागाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे यापुढे नियम 33(11) अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची जबाबदारी आणि सर्व अधिकार पूर्णपणे मुंबई महापालिकेकडेच सोपवण्यात यावेत, अशी ठाम मागणी आयुक्त भिडे यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे. हे ही वृत्त वाचा

संजय राऊत हे कामशास्त्री, त्यांनी न्यायालयासंदर्भात बोलू नये:मनपाच्या खर्चावर बोलण्यापूर्वी पेडणेकरांनी स्वतःच्या काळातील हिशेब द्यावा- नवनाथ बन

संजय राऊत हे कामशास्त्री आहेत, त्यांनी न्यायालय आणि संविधानाबद्दल बोलू नये. एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यावर ठाकरे गटाची पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. रामशास्त्री कोण आहे हे शोधण्यापेक्षा राऊतांनी आपण कामशास्त्री कसे झालो याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.