Headlines

महाराष्ट्रात नराधमांना राजकीय पाठबळ:मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान राहतील, शहा सुद्धा त्यांच्यासोबतच जातील- संजय राऊत




पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत; त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावे लागणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हे सर्व काही तुम्हाला कळेल; तो पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल. अमित शहा कधीही पंतप्रधान होणार नाहीत, कारण मोदी गेले की तेही जातील, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, देशभरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे, चोरांना सोडून देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात तर खुनी आणि बलात्कारी लोकांना सोडून देऊन पक्षात प्रवेश दिला जातो. विनोद तावडे हे जुन्या भाजपचे नेते आहेत; शिवसेना आणि भाजपची युती तुटू नये, असे त्यांना वाटत होते. त्यांचे काम चांगले असल्यानेच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा निकाल पूर्णपणे वेगळा लागणार आहे, कारण तिथला मतदार आता जागा झाला आहे आणि तिथे समाजवादी पक्ष चांगले काम करत आहे. महाराष्ट्रातील आश्रम शाळांची परिस्थिती बघावी संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मुद्द्यावर वकील कपिल सिब्बल न्यायालयात योग्य प्रकारे युक्तिवाद करत आहेत. ‘धनुष्यबाण’ आणि शिवसेना पक्ष आमचाच आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील आश्रमशाळांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मंत्री आता विद्यापीठात गेले किंवा कुठेही गेले, तरी ‘जेन झी’ त्यांच्यासोबत जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवस कठीण आहेत, त्यांनी चांगले काम केले पाहिजे. त्यांचा मूर्खपणा आता उघड होत आहे. सत्ताधाऱ्यांना त्यावर बोलावे वाटत नाही का? संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. जुन्नरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, यावर राज्याचे मुख्यमंत्री काय करत आहेत? महिला आरक्षणाचे विधेयक आधीच मंजूर झाले आहे, तरीही त्यांना ते पुन्हा मंजूर करायचे आहे. तुमच्याच राज्यात 9-10 वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना तुम्हाला, सरकारला आणि सरकारच्या ‘वहिनीसाहेबांना’ याचे काहीच दुःख होत नाही का? असा थेट सवाल राऊत यांनी केला. मी दिल्लीत जाणार नाही, महाराष्ट्रातच राहीन, असे तुम्ही सांगता; शिवसेनेच्या निकालावर मते व्यक्त करता. मात्र मुलींवर होणारे अत्याचार आणि सापाच्या दंशाने होणारे मुलींचे मृत्यू यांवर राज्याचे मुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री आणि ज्यांचे उपमुख्यमंत्रीपद जाणार आहे त्यांना काही बोलावेसे वाटत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस हे अपयशी गृहमंत्री संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत. अमेरिकेचे हाय कमिशनर मुंबईत आले आणि त्यांनी एक वक्तव्य केले; पण त्यांना महाराष्ट्रात मुलींवर होणारे अत्याचार दिसले नाहीत का? ते जम्मू-काश्मीरमध्ये जाऊनही तसेच बोलले. त्यांना सापाच्या दंशाने झालेले मृत्यू दिसले नाहीत का? पोलिस अत्याचार करणाऱ्यांना कसे वाचवतात, याबद्दल माझ्याकडे काही कागदपत्रे आहेत. शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्यावर अत्याचाराचा आरोप असून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. ती मुलगी सर्व ठिकाणी जाऊन आली, पण काहीही कारवाई झाली नाही. ज्यांनी हे प्रकरण लावून धरले आहे, त्यांना पोलिस नोटीस देऊन बोलावून घेतात, दिवसभर बसवून ठेवतात आणि ‘हे प्रकरण मागे घ्या, नाही तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू’ अशी धमकी पोलिस निरीक्षकांकडून दिली जात आहे. ..तर मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढतील संजय राऊत शेवटी म्हणाले की, जर पोलिसच अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार असतील, तर मुलींवरील अत्याचार वाढणारच. पोलिसांची कायद्याचे पालन करण्याची इच्छा उरलेली नाही आणि दुसरीकडे सरकार ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक आणत आहे. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, अन्यथा मी ते मार्गी लावेन, असा इशारा राऊतांनी दिला. अत्याचार करणाऱ्या लोकांना पोलिस संरक्षण का दिले जाते? असा प्रश्न विचारत राऊत यांनी, प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोपही केला.

हेही वाचा… राज्यात पावसाचा ‘ब्रेक’ कायम:मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; पण 4 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, विजांसह वादळी सरींचा अंदाज राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली असून पावसाचा जोर सध्या कमकुवत झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. असे असले तरी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील ४ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *