Headlines

अनैतिक संबंधांच्या वादातून खारमध्ये मजुराची हत्या:अल्पवयीन पुतण्यानेच केला काकाचा खून; सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला मृतदेह




खार पश्चिमेतील रोड क्रमांक 7 वर असलेल्या एका बांधकाम साईटवर 35 वर्षीय मजुराची निर्घृण हत्या करून मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवल्याची घटना उघडकीस आली आहे. खार पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, मृताच्या 17 वर्षींय अल्पवयीन पुतण्यानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पश्चिम नियंत्रण कक्षाला खार येथील एसबीआय बँकेसमोरील बांधकाम साईटवर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. खार पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, रविशंकर नंदकिशोर गिरी (वय 35, रा. समस्तीपूर, बिहार) हे मजूर मृतावस्थेत आढळून आले. तपासादरम्यान त्यांचा मृतदेह सिमेंटच्या गोण्या आणि इतर बांधकामाच्या साहित्याखाली दडपून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी खार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा (गु.र.क्र. 1372/2026) दाखल करण्यात आला. तक्रारदार बनून दिशाभूल करण्याचा प्रयत्न निष्फळ हा प्रकार 17 ऑगस्ट 2026 च्या सकाळी 9:30 ते दुपारी 2:00 या वेळेत घडल्याचा संशय आहे. हत्येनंतर आरोपी पुतण्या विशालकुमार रामलखन गिरी याने स्वतः पोलिस ठाण्यात तक्रारदाराची भूमिका घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीदरम्यान त्याची देहबोली, हालचाली आणि जबाबातील विसंगती यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. तांत्रिक पुरावे अन् सहकाऱ्यांच्या चौकशीने उघड केला कट खार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करत बांधकाम साईटवरील अन्य मजुरांची कसून चौकशी केली. या तपासात आरोपीच्या जबाबाचा बुरखा टरकला आणि त्यानेच काकाचा खून केल्याचे उघड झाले. अनैतिक संबंधांच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खार पोलिस ठाण्याच्या पथकाने अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हे ही वृत्त वाचा

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *