![]()
भंडारा जिल्ह्यातील खराशी गावात महाप्रसादातून १६९ हून अधिक लोकांना अन्नबाधा झाली. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने अनेकांना खराशी, पालांदूर, भंडारा येथील रुग्णालयांत दाखल केले. प्रशासनाने आरोग्य शिबिर सुरु केले आहे. एफडीएचे सहायक आयुक्त नीलेश ताथोड यांनी सांगितले की, महाप्रसादासाठी सात दिवस आधी पूर्वसूचना अर्ज नव्हता. त्यामुळे तपासणी करता आली नाही. एफडीएच्या पथकाने घटनास्थळी जाऊन अन्नाचे नमुने गोळा केले. खराशी येथील गायत्री माता मंदिरात २० ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रोत्सवानिमित्त ७०० ते ८०० ग्रामस्थांनी महाप्रसाद घेतला. यात भात, पोळी, वरण, बटाटा-वांग्याची भाजी, जिलेबी, कढी आणि चण्याचा सलाड हे पदार्थ होते. महाप्रसाद तयार करण्यासाठी वापरलेला कच्चा माल, शिजवण्याची पद्धत, साठवणूक आणि वितरणादरम्यानची स्वच्छता तपासली जात आहे. अन्नबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी ही तपासणी महत्त्वाची आहे.
Source link
खराशीत महाप्रसादातून 169 हून अधिक ग्रामस्थांना विषबाधा:यात तीन गर्भवती महिलांचा समावेश; एफडीएकडे पूर्वसूचना अर्ज नव्हता