Headlines

दीक्षाभूमीवर 3 दिवसांत 144 टन कचरा उचलला:एका दिवसात 41 हजार अनुयायांचा बसप्रवास; 872 कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात




दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी लाखो अनुयायी आले होते. नागपूर महापालिकेसमोर स्वच्छता आणि वाहतुकीचे मोठे आव्हान होते. १८ ते २० ऑक्टोबर या तीन दिवसांत दीक्षाभूमी परिसरातून १४४ टन कचरा उचलला, तर ‘आपली बस’मधून ५८ हजार ८४ प्रवाशांनी प्रवास केला. स्वच्छतेसाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ८७२ सफाई कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये तैनात केले. कचरा संकलनासाठी २३४ कर्मचारी, १०८ वाहने आणि १९० कचरा कुंड्या वापरल्या. जमा कचऱ्याची भांडेवाडी येथे विल्हेवाट लावली. वाहतुकीसाठी ‘आपली बस’ सेवेचा वापर झाला. २० ऑक्टोबरला एकाच दिवशी ड्रॅगन पॅलेससाठी १४५ बसमधून ४१ हजार १७५ प्रवाशांनी प्रवास केला. तीन दिवसांतील एकूण प्रवाशांपैकी मोठा हिस्सा शेवटच्या दिवशी प्रवास करत होता. अनुयायांच्या निवासासाठी २१ डोम आणि १२०० हून अधिक शौचालये उभारली. परिसरात १२० नळांद्वारे पाण्याची व्यवस्था केली. सुरक्षेसाठी ४४ स्थायी आणि १६ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे लावले. मनपाचे कर्मचारी १८ ऑक्टोबरपासून २४ तास कार्यरत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *