“धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पुजले होते. आता ‘धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका’, ही मागणी करणे म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे आहे,” असा जोरदार
.
ठाकरे गटाची मानसिकता उघड
गेले काही दिवस सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात असताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावे’ अशी मागणी केली. यावर बोलताना देसाई म्हणाले, “जेव्हा त्यांना लक्षात आले की हे चिन्ह आता आपल्याला मिळणार नाही, तेव्हा त्यांनी अशी मागणी केली. म्हणजेच स्वतःला मिळत नाही तर ते दुसऱ्यालाही मिळू नये, ही त्यांची बेगडी भूमिका समोर आली आहे.”

बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह
बाळासाहेब ठाकरे यांनी कायम सांगितले होते की, ‘शिवसेनेचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण शिवसैनिकांनी कधीही खाली पडू देऊ नये.’ असे असताना ठाकरे गटाचे नेतेच चिन्ह गोठवण्याची भाषा करत आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी करताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले होते. आता चिन्ह गोठवण्याची मागणी करून ते पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करत आहेत, असा आरोप देसाई यांनी केला.
शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप
ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. जे चिन्ह बाळासाहेबांनी देवाऱ्यात पुजले, तेच चिन्ह गोठवण्याची मागणी करणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांनाच संपवण्याचा प्रयत्न आहे. शिवसैनिक योग्य वेळी या वक्तव्याला चोख उत्तर देतील, असा इशाराही देसाई यांनी दिला.
चिन्ह आम्ही नाही, निवडणूक आयोगाने दिले
आदित्य ठाकरे वारंवार ‘पक्ष आणि चिन्ह चोरले’ असा आरोप करतात. यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतरच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हे आम्ही चोरलेले नाही, तर कायदेशीर प्रक्रियेतून मिळवले आहे.
जनतेने शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले
जर आम्ही पक्ष चोरला असता, तर आमच्या आमदारांची संख्या 40 वरून 60 झाली नसती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला एवढे मोठे बहुमत दिले नसते. महाराष्ट्रातील जनतेने मतदान करून हे सिद्ध केले आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टात योग्य वेळी उत्तर देऊ
सुप्रीम कोर्टातील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर बोलताना देसाई म्हणाले की, सध्या केवळ ठाकरे गटाची बाजू ऐकली जात आहे. जेव्हा आमची वेळ येईल, तेव्हा आमचे वरिष्ठ वकील सर्वोच्च न्यायालयात या सर्व आरोपांना सडेतोड आणि कायदेशीर उत्तर देतील.
हेही वाचा…
मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” असा आक्रमक इशारा अमित ठाकरे यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी