![]()
“कोरोना हा काळ एका भीषण संकटाचा होता. त्यावेळी अनेकांनी कर्ता पुरुष गमावला. अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांचे पालकत्व आम्ही स्वीकारले होते, आणि आज त्यातील एका एकल मातेचा, ‘प्रीती’चा पुनर्विवाह होत आहे, याचा मला अत्यंत मनस्वी आनंद आणि समाधान आहे,” अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केल्या. प्रीती आकडे हिच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांनी नववधू-वराला आशीर्वाद दिले आणि त्यानंतर माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. कोरोना काळात 300 कुटुंबांचे स्वीकारले होते पालकत्व कोरोनाच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना, त्यांनी आणि आमदार संदीप जोशी (सिद्धिविनायक फाउंडेशन) यांनी मिळून जवळपास 293 कुटुंबांचे पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प केला होता. यापैकी 100 कुटुंबांचे पालकत्व स्वतः फडणवीसांनी स्वीकारले होते. प्रीती यांच्या पहिल्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला होता, ज्यानंतर फडणवीस आणि जोशी यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. आज प्रीतीचा ‘शिवम’ सोबत विवाह होत असून, या कुटुंबांमधील 300 मुलींचे विवाह होईपर्यंत सर्व जबाबदारी स्वीकारल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय समाधानाची बाब महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांसाठी सरकारी नोकरीत १% आरक्षण लागू केले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अनेक मुले अनाथ आश्रमात वाढतात, त्यांची काळजी घेणारे कोणी नसते. पण जेव्हा ही मुले मेहनत करून या आरक्षणामुळे सरकारी नोकरीत जातात, तेव्हा ते पाहून खरोखरच खूप समाधान वाटते.” ‘लाडकी बहीण’ योजना: 92 लाख महिला अपात्र ठरल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण ‘लाडकी बहीण’ योजनेचे नियम आणि निकष स्पष्ट आहेत. या योजनेची तपासणी कॅग (CAG) करते, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन कोणालाही पैसे देता येत नाहीत. 1 कोटी 65 लाख महिलांनी ‘ई-केवायसी’ केले असून, त्यांना नियमित पैसे मिळत आहेत. काही महिला इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब असल्यामुळे अपात्र ठरल्या, तर काही पुरुष आणि सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेण्याचा प्रयत्न केला. अशा पुरुषांवर कारवाई व वसुली सुरू असून, सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. काँग्रेसच्या लोकांनीच या योजनेला न्यायालयात आव्हान दिले होते, आणि आता तेच मगरीचे अश्रू ढाळत आहेत, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. काँग्रेसवर सडकून टीका; ‘वंदे मातरम’ ठरावाला संविधानाचा द्रोह म्हटले काँग्रेस समितीने ‘वंदे मातरम’चे केवळ दोनच कडवे गाण्याचा जो ठराव पारित केला आहे, त्यावर फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. “हा आता इंग्रजांचा भारत नाही. स्वतंत्र भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय हा घटनात्मक असतो. संसदेचा निर्णय आम्ही मानणार नाही, असे म्हणणे म्हणजे संविधानाशी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसची ही मानसिकता म्हणजे निव्वळ मतांचे लांगूलचालन आणि मानसिक गुलामगिरीचे लक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर टीका काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यातील तरुणांशी संवाद साधणार आहेत, याबद्दल विचारले असता फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा एक ओपन इव्हेंट (खुला कार्यक्रम) नाही. माझ्या माहितीनुसार, केवळ काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थांमधील मुलींनाच तिथे बोलावले जाणार आहे आणि त्यांचीच नोंदणी केली जाईल. हा एक नियंत्रित वातावरणातील कार्यक्रम आहे, त्यामुळे याला विद्यार्थ्यांचा संवाद म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्याच लोकांशी केलेला तो एकपात्री संवाद ठरेल.” केंद्रीय मंत्र्यांचा विद्यापीठांशी संवाद चांगला उपक्रम केंद्रीय मंत्र्यांनी विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. “विद्यापीठे ही आपले भविष्य निर्माण करणारी केंद्रे आहेत. यामुळे देशाची आणि जगाची दिशा विद्यार्थ्यांना समजेल, तसेच विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मंत्र्यांना ‘फर्स्ट हँड’ समजण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले. हेही वाचा… मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” असा आक्रमक इशारा अमित ठाकरे यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या 'प्रीती'चा पुनर्विवाह:कोरोना काळात स्वीकारले होते 300 कुटुंबांचे पालकत्व, काँग्रेसवरही डागली तोफ!