Headlines

BJP Leader Navnath Ban Mocks Sanjay Raut Over Rahul Gandhi PM Dream


पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करतील आणि 18 तारखेला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, तसेच त्यांच्या जोडीला संजय राऊत देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी स्वप्ने राऊतांना पडत आहेत, असा जोरदार टोला भाजपचे मुख्य प्र

.

नवनाथ बन पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला वाढदिवस साजरा केल्यावर राष्ट्रपती भवनात जाऊन राजीनामा सादर करतील आणि ‘राहुल गांधी यांना पंतप्रधान करा’ असे सांगतील; सोबतच ‘संजय राऊत यांना गृहमंत्री करा’ अशी दुसरी अटही ठेवतील. 18 सप्टेंबर 2026 रोजी या दोघांचा शपथविधी सोहळा होणार आहे, असा उपहासात्मक टोला बन यांनी लगावला. राऊतांनी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणे बंद केले पाहिजे. आता तर तुम्हाला स्वप्नातही राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र, राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे राऊतांचे स्वप्न या जन्मात तरी पूर्ण होणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.

म्हणून राऊतांच्या पोटात दुखते

नवनाथ बन म्हणाले की, अमेरिकेचे राजदूत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असल्याने संजय राऊतांना त्रास होत आहे. आपले मालक इतके चांगले काम करू शकले नाहीत, त्यांचे शरद पवारसुद्धा कौतुक करत नाहीत; तर दुसरीकडे ‘देवाभाऊंचे’ कौतुक अमेरिकेचे राजदूत करत असल्याचा त्रास राऊतांना होत आहे. ही तर फक्त सुरुवात आहे; यापुढे असे अनेक विक्रम देवाभाऊंच्या नावावर जमा होतील आणि जगभरातील लोक त्यांच्या महाराष्ट्रातील कामाचे कौतुक करतील. राऊतांकडे कौतुक करण्यासारखे काहीही नाही. तुमच्या मालकाचे कोणीही कौतुक केले नाही; उलट तुमच्या मित्रपक्षानेच तुमच्या मालकावर टीका केली आहे.

फडणवीस अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री

नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री आहेत, याचा निकाल विधानसभेच्या वेळी महाराष्ट्रातील जनतेनेच दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात टीका करणाऱ्या लोकांना आणि पत्रकारांना जेलमध्ये टाकले जात होते; तर देवेंद्र फडणवीस हे 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी हिंदुत्व कधीही बाजूला सारलेले नाही. याउलट, मुंबईला लुटण्याचे काम राऊतांच्या मालकांनीच केले आहे.

..तर नगरसेवकावर कारवाई होईल

नवी मुंबई प्रकरणावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, शिंदे गटाच्या स्वीकृत नगरसेवकावरील आरोपांची दखल पोलिस प्रशासन गांभीर्याने घेईल. जर त्यात ते दोषी आढळले, तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. राऊत हे स्वप्ना पाटकर यांना धमक्या देण्याचे काम करत आहेत, त्यामुळे त्यांनी महिलांवरील अत्याचारावर बोलू नये. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस पूर्णपणे सक्षम आहेत.

हे ही वृत्त वाचा महाराष्ट्रात नराधमांना राजकीय पाठबळ:मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान राहतील, शहा सुद्धा त्यांच्यासोबतच जातील- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत; त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावे लागणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हे सर्व काही तुम्हाला कळेल; तो पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल. अमित शहा कधीही पंतप्रधान होणार नाहीत, कारण मोदी गेले की तेही जातील, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर राज्यात पावसाचा ‘ब्रेक’ कायम:मराठवाड्यात पावसाची मोठी तूट; पण 4 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, विजांसह वादळी सरींचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली असून पावसाचा जोर सध्या कमकुवत झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि बिहारकडे सरकल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. असे असले तरी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील ४ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.