Headlines

पुण्यात डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नावाखाली 70 विद्यार्थ्यांची फसवणूक:महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल




पुण्यात डिझायनिंग अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने 70 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी एका महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीतील एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात प्रथमेश अशोक राऊत (वय 26), प्रतीक्षा अशोक राऊत (वय 28, रा. पुनावळे) आणि संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. याबाबत एका पालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा परिसरात ‘फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग’ ही शैक्षणिक संस्था आहे. फिर्यादी मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून, त्यांच्या मुलीला डिझायनिंग अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. आरोपींनी फिर्यादीसह 70 विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून शुल्क घेतले. हे शुल्क महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी एका महिला आरोपीच्या खात्यात जमा करण्यात आले. पालकांनी शुल्काची पावती मागितल्यावर आरोपींनी महाविद्यालयाच्या नावाने बनावट पावत्या दिल्या.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत. हॉटेलमध्ये झोप लागल्याचा फायदा घेत मोबाईल चोरी खराडी-मुंढवा रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या तरुणाला झोप लागल्याचा फायदा घेत चोरट्याने 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय कृष्णा विनकरे (वय 27, रा. गोदरेज बुलेवार्ड, मांजरी खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉटल स्टोरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. फिर्यादीला झोप लागल्याचे पाहून चोरट्याने टेबलवरील मोबाईल चोरून नेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *