![]()
अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान काही युजर्सकडून झालेल्या कथित अश्लील कमेंट्समुळे ती संतापली. श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या प्रकारावर नाराजी व्यक्त करत महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. श्वेताच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान काही युजर्सनी तिच्याबद्दल तसेच तिच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. यातील काही युजर्स स्वतःला ‘मराठी माणूस’ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक असल्याचे सांगत असल्याचा दावा श्वेताने केला. ‘माझ्या मुलांबद्दलही आक्षेपार्ह कमेंट्स’ श्वेताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही युजर्सनी तिच्या ८ वर्षांच्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचे म्हटले आहे. या प्रकारावर संताप व्यक्त करत तिने संबंधित युजर्सच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये श्वेताने म्हटले की, संबंधित व्यक्तींच्या प्रोफाइलवर त्यांच्या पत्नी, मुली आणि कुटुंबीयांचे फोटो दिसतात. असे असूनही दुसऱ्या महिलेबद्दल अशा पद्धतीने बोलण्याची मानसिकता कशी असू शकते, असा सवाल तिने केला. ‘मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आहे का?’ श्वेताने स्वतःच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्याचाही उल्लेख केला. आपला जन्म मुंबईत झाला असून महाराष्ट्रातच आपण वाढल्याचे सांगत तिने ‘मराठी माणूस’ या ओळखीबाबत भूमिका मांडली. महिलांचा आदर करणे हा मराठी संस्कृतीचा भाग असल्याचे सांगत, स्वतःला ‘मराठी माणूस’ म्हणवून घेणारे काही लोक महिलांना अश्लील शिवीगाळ करत असतील, तर मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आहे का, असा सवाल तिने केला. राज ठाकरेंना थेट सवाल या प्रकरणात काही युजर्सनी स्वतःला राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे समर्थक असल्याचे सांगितल्याचा दावा श्वेताने केला. त्यामुळे तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही थेट सवाल केला. ‘असे लोक तुमचे समर्थक असतील, तर तुम्हाला हे वर्तन मान्य आहे का?’, असा प्रश्न श्वेताने उपस्थित केला. केवळ मराठी बोलणे किंवा स्वतःला मराठी माणूस म्हणवणे पुरेसे नसून महिलांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तिने म्हटले. ‘सर्व महिलांचा आदर करा’ आपल्या पोस्टच्या माध्यमातून श्वेताने महिलांबद्दल ऑनलाइन माध्यमांवर अश्लील भाषा वापरणाऱ्यांवरही टीका केली. एखादी महिला परिचित नसली किंवा तिचे विचार पटत नसले, तरी तिचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही, असे तिने म्हटले. ‘फक्त आपल्या घरातील महिलांचा नाही, तर प्रत्येक महिलेचा आदर करा,’ असा संदेश देत श्वेताने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. श्वेता तिवारीने केलेली पोट्स.. हेही वाचा.. राजपाल यादव म्हणाले- ज्यांचे पैसे बाकी आहेत, घरी पोहोचवून देईन:13 वर्षांत 250 कोटींचे नुकसान झाले; बँक घराचा लिलाव करत आहे बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स आणि कर्ज विवादादरम्यान दावा केला आहे की, गेल्या 13 वर्षांत त्यांना 200 ते 250 कोटी रुपयांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना, 55 वर्षीय अभिनेत्याने सांगितले की ते एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि ज्या लोकांचे पैसे बाकी आहेत, ते त्यांना परत करतील किंवा त्यांच्या घरी पोहोचवतील. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 16 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे त्यांचे वडिलोपार्जित घर लिलाव करण्यासाठी नोटीस जारी केली असताना हे विधान आले आहे. सविस्तर वाचा..
Source link
मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल