Headlines

Sanjay Raut Slams Amit Shah Over Maharashtra Cooperative Banks Control


महाराष्ट्र लुटण्याचा विचार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहोत, असे कशाच्या आधारे म्हणत आहेत? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत य

.

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, अमित शहा 8 ऑगस्ट रोजी मुंबईत आले होते. आम्ही संसदेत त्यांची वाट पाहत होतो, मात्र ते तेथे आले नाहीत. त्यांनी मुंबईतील शारदा सदन इमारतीमध्ये ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे उद्घाटन केले. ही संस्था सर्व नागरी सहकारी बँकांची प्रमुख (अ‍ॅपेक्स संस्था) म्हणून काम करेल, असे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचा महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील बँकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी किंवा त्या बंद पाडण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी संसदेत एक विधेयक घाईघाईने मंजूर करून घेण्यात आले.

महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हे सहकार चळवळीतील अग्रगण्य राज्य आहे. सहकाराची मुहूर्तमेढ याच भूमीत रोवली गेली आहे. असे असतानाही या निर्णयाबाबत महाराष्ट्रातील एकाही घटकाचे किंवा बँकेचे मत विचारात घेतले गेले नाही. या धोरणामुळे राज्यातील बँकांवर काय परिणाम होईल, याचा कोणताही अभ्यास करण्यात आला नाही.

घोटाळा दाबण्यासाठीच विलीनीकरण?

संजय राऊत म्हणाले की, गुजरातमधील एका घोटाळेबाज बँकेला वाचवण्यासाठी तिचे विलीनीकरण ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’मध्ये करण्यात आले आणि त्याद्वारे तेथील भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आणणारा हा निर्णय होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करत होते? त्यांना या विषयातील गांभीर्य कळते का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राला संपवण्याचा हा कट

संजय राऊत म्हणाले की, अमित शहा जाता जाता महाराष्ट्रावर मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारा आहे. आता महाराष्ट्राने काय करायचे? अमित शहा आणि गुजरातच्या दारात भीक मागायला जायचे का? हा अत्यंत गंभीर विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ते जर याचे स्वागत करत असतील, तर ते बाळासाहेबांचा कोणता विचार पुढे नेत आहेत? हजारो लोकांची रोजीरोटी या सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. सर्व काही गुजरातच्या घशात घालण्यासाठी आणि शहा यांच्या मर्जीतील संस्थांचा फायदा करून देण्यासाठीच हा सर्व प्रपंच सुरू आहे.

हे ही वृत्त वाचा

घटनेचा आदर कोण करते हे जनतेला ठाऊक:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतली, काँग्रेस नेते सतेज पाटलांचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी आम्ही 400 पार करू आणि घटना बदलू, त्यासाठी आम्हाला बहुमत हवे आहे अशी वक्तव्ये देशभरात केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोण मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काँग्रेसवर बोट दाखवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. संविधानाचा खरा आदर कोण करतो, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे. वंदे मातरमबाबत दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य असतानाही काँग्रेस तो मानत नाही, काँग्रेस देशद्रोह करत आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.