![]()
लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनात तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी प्रशासनात जावेत, यासाठी त्यांना योग्य सुविधा आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,
.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी पूर्ण वेळ, संयम आणि विश्वास द्यावा. आत्मविश्वासाने व सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज उभा राहतो, असे अभंग यांनी सांगितले.
प्राजक्ता कचरे हिने स्पर्धा परीक्षेतील मोठी स्पर्धा अधोरेखित करत पालकांचा विश्वास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राजेंद्र आठरे यांनी आठ वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश मिळाल्याचे सांगत आपल्या यशाचे श्रेय वडील, भाऊ व पत्नीला दिले. प्रसाद देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास सुरू ठेवत यश मिळविल्याचा अनुभव सांगितला. पालकांनी मुलांवर दबाव न आणता त्यांच्या क्षमतेनुसार संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. शिरीष लांडगे यांनी स्पर्धा परीक्षेत बौद्धिक क्षमतेसोबत शारीरिक व मानसिक कस लागत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. शिवाजी शिंदे यांनी, सुत्रसंचालन अशोक पंडित यांनी, तर आभार सुनील गव्हाणे यांनी मानले.