![]()
जागतिक छायाचित् दिनानिमित्त रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स यांच्या वतीने कॅम आर्ट, शेवगाव येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागातील फोटोग्राफर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली. मार्गदर्शक व मेंटर राम नाईक यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यावर मार्गदर्शन केले. एआयचा फोटोग्राफी क्षेत्रात प्रभावी व योग्य पद्धतीने वापर कसा करता येईल, याची विविध उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली.एआयच्या माध्यमातून फोटो एडिटिंग, क्रिएटिव्ह कामकाज, वेळेची बचत तसेच फोटोग्राफी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या संधी याबाबत नाईक यांनी मार्गदर्शन केले. काळानुसार बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आजच्या फोटोग्राफर्सची गरज आहे,असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास निखिल गायकवाड, महादेव बढे, प्रमोद लोळगे, भागवत तारक, सोनू काटे, नितीन जवंजाळ, अक्षय मुंगसे यांच्यासह रिस्पेक्ट फाउंडेशनशी संबंधित अनेक फोटोग्राफर्स उपस्थित होते. फोटोग्राफीची कला आणि व्यवसायाला एआयची जोड देत नव्या संधींचा शोध घेण्यासाठी हा कार्यक्रम फोटोग्राफर्ससाठी उपयुक्त ठरला. ग्रामीण भागातील छायाचित्रकारांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम भविष्यातील बदलांसाठी दिशादर्शक ठरला.
Source link
कॅमेऱ्याच्या नजरेला ‘एआय’ची साथ; फोटोग्राफर्सना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे:जागतिक छायाचित्रदिनानिमित्त रिस्पेक्टफाउंडेशनचा उपक्रम