![]()
दलित, शोषित, कष्टकरी आणि वंचितांच्या वेदनांना आपल्या लेखणीची ताकद देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती उक्कडगाव येथे उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
.
जयंती सोहळ्यात लहान मुलांची भाषणे विशेष लक्षवेधी ठरली. चिमुकल्या वक्त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनसंघर्ष, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यावर प्रभावी विचार मांडत उपस्थितांची दाद मिळवली. भविष्यातील पिढी अण्णाभाऊंच्या विचारांशी जोडली जात असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. व्याख्याते प्रा. केशव कातोरे यांनी अण्णा भाऊंच्या जीवनकार्यावर वैचारिक व्याख्यान दिले. अण्णाभाऊंनी उपेक्षित घटकांचा आवाज आपल्या साहित्याच्या माध्यमातून बुलंद केला. त्यांच्या साहित्यामध्ये संघर्ष, स्वाभिमान, समता आणि परिवर्तनाची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील तात्या महाडिक, पंचशील तरुण मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव समितीने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दत्ताभाऊ शिंदे यांनी केले.
जयंतीपुरते स्मरण नको लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना केवळ जयंतीपुरते स्मरण करून चालणार नाही. त्यांचे साहित्य वाचले पाहिजे, विचार समजून घेतले पाहिजेत आणि ते आचरणात आणले पाहिजेत, असा संदेश प्रा. केशव कातोरे यांनी दिला.