![]()
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. “अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे,” असा धक्कादायक दावा पटोले यांनी केला आहे. तसेच, संघाच्या जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर आणि बँक खात्यांवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून राम मंदिराच्या निधीवरून संघावर सडकून टीका केली आहे. ३६ देशांतील बँक खात्यांवरून सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर आणि निधीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आज जागतिक पातळीवर आरएसएसच्या बाबत एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जगभरातील तब्बल ३६ देशांमध्ये या संघटनेचे बँक खाते आहे. या खात्यांमध्ये अमाप पैसा जमा आहे. मात्र, हा पैसा नेमका कुठून येतो? तो कुणी दिलेला आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पैशांचे कोणतेही ऑडिट (लेखापरीक्षण) का होत नाही?” असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले. राम मंदिर निधीतही लुटीचा आरोप अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी संघाला लक्ष्य केले. ते म्हणाले, “राम मंदिर हे संपूर्ण देशाचे आणि सर्वांचेच श्रद्धेचे स्थान आहे. मात्र, या मंदिराच्या उभारणीत आणि निधीतही लूट करण्यात, त्यावर डाका टाकण्यात आरएसएसचा सहभाग आहे, आणि ही बाब आता कोणापासूनही लपलेली नाही.” अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष अमेरिकेने संघाला दहशतवादी संघटना ठरवल्याच्या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार करत पटोले यांनी स्पष्ट केले की, “जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या या स्थितीमुळे अमेरिका आता या संघटनेबाबत नेमकी काय भूमिका (स्टँड) घेते, याकडे आमचे आणि सर्वांचेच बारकाईने लक्ष लागून आहे.” पटोले यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. राज्यातील नागरी सहकारी बँका संपवण्याचा अमित शहांचा प्रयत्न:महाराष्ट्राने शहा अन् गुजरातच्या दारात भीक मागायची का?- खासदार संजय राऊत महाराष्ट्र लुटण्याचा विचार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहोत, असे कशाच्या आधारे म्हणत आहेत? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व काही गुजरातला मिळावे यासाठीच नवी विधेयके संसदेत मंजूर केली जात असून, राज्यातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व संपवण्याचा घाट केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा
Source link
अमेरिकेने RSS ला दहशतवादी संघटना घोषित केले:नाना पटोले यांचा खळबळजनक दावा, राम मंदिर निधीवरूनही केले गंभीर आरोप