![]()
श्रीरामपूर शेती महामंडळाच्या हरिगांव मळा कार्यक्षेत्रातील सर्व जमिनीचा सर्वे नंबर नकाशा तयार करण्यात आला असून अकारी पडीत शेतकऱ्यांचे वारसासाठी हरिगांव ३ हजार व अन्य महामंडळ हद्दीत १ हजार ५०० एकर जमीन राखीव ठेवण्यात येऊन उर्वरित जमीन उद्योगांना देण्याचे निश्चित झाले आहे. २५ तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत आकारी पडीत जमीन वाटपासंदर्भात नवीन प्रस्ताव मंजूर करून राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आकारी पडीत कृती समितीचे प्रमुख अँड. अजित काळे, नितीन दिनकर, गिरीधर आसने, दीपक पटारे, शरद आसने, सचिन वेताळ, डॉ. शंकर मुठे आदींच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. याबाबत मंत्री बावनकुळे आणि ॲड. काळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी ते म्हणाले, शेती महामंडळाच्या हरिगांव मळ्यावर भविष्यात एक गुंठाही जमीन पडीत राहणार नाही. हरिगांव मळा कार्यक्षेत्रातील जमिनीवरील सर्व ब्लॉकचे नकाशे तयार करण्यात आले आहे. अकारी पडीत शेतकऱ्यांचे वारसांना हरेगांव मळ्यात तीन हजार एकर सोयीनुसार गावालगतच्या जमीनी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. आकारी पडीत वारसांना जमिनी कमी पडल्यास अन्य मळ्यातील जमिनी देण्याचे प्रयोजन करण्यात येईल. या जमिनी देण्याची मानसिकता सरकारची असून पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीनंतर प्रस्ताव राज्यपालांचे सहिसाठी पाठविण्यात येईल. राज्यपालाकाडून मंजूर प्रस्ताव आल्यानंतर सर्व प्रक्रिया थांबून एकच जमिन वाटपाची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले. आकारी पडीत शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेतली.
Source link
आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच जमीन:राज्यपालांच्या सहीनंतर वाटप सुरू होणार