![]()
पुण्यातील वानवडी येथील लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारातील मेसमधून चोरट्यांनी 65 हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. कॅप्टन लक्ष्मी एस (वय 29, रा. ऑफिसर्स मेस, कमांड हॉस्पिटल आवार, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना कमांड हॉस्पिटलच्या आवारातील ऑफिसर्स मेसच्या कार्यालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मेसच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. त्यानंतर कपाटात ठेवलेली 65 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत. पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पाकीट चोरणारी टोळी जेरबंद पीएमपी बसमधून हडपसरकडे निघालेल्या प्रवाशाच्या मागील खिशातून तीन हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट चोरल्याप्रकरणी तिघांना पकडण्यात आले. याप्रकरणी आकाश राधेश्याम ठाकूर (वय 30, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), योगेश गणेश माने (वय 45, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि अरविंद दीपक जाधव (वय 41, रा. शिंदे वस्ती, केशवनगर) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय राजू दनाने (वय 36, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता तुकाराम शेठ शिंदे वाहनतळ ते हडपसर प्रवासादरम्यान चोरी झाली. आरोपींनी गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या मागील खिशातील पाकीट काढले.
Source link
वानवडीतील लष्कराच्या रुग्णालयातील मेसमधून 65 हजारांची रोकड चोरीला:अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल