![]()
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी आम्ही 400 पार करू आणि घटना बदलू, त्यासाठी आम्हाला बहुमत हवे आहे अशी वक्तव्ये देशभरात केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोण मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काँग्रेसवर बोट दाखवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. संविधानाचा खरा आदर कोण करतो, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे. वंदे मातरमबाबत दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य असतानाही काँग्रेस तो मानत नाही, काँग्रेस देशद्रोह करत आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
कार्यक्रमासाठी कोणीही येऊ शकते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याची मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे धास्ती घेतली आहे. आज देशातील तरुण आणि तरुणी राहुल गांधी यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. ते तरुणांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, मात्र मुख्यमंत्री त्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांना यायचे आहे ते येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही धास्ती चांगलीच आहे. राहुल गांधींनीच सर्व प्रथम आवाज उठवला सतेज पाटील म्हणाले की, जेन झी’चे आंदोलन असो किंवा नीट पेपरफुटीचे प्रकरण असो, राहुल गांधी यांनीच सर्वात आधी या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळेच हे मुद्दे ऐरणीवर आले. विरोधक म्हणून सरकारच्या चुका दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत देशातील युवक-युवतींसाठी काय केले, याचे उत्तर द्यावे.
हे ही वृत्त वाचा
गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या मार्गी लावणार- चंद्रशेखर बावनकुळे:म्हणाले- सर्वसामान्यांना स्वस्त घरे मिळणार; ‘आदर्श’ नंतर रखडलेल्या धोरणावर लवकरच निर्णय
राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षांत सुमारे 950 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या 20 वर्षांपासून थांबलेल्या सर्व पदोन्नत्या मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आज तब्बल 40 हून अधिक तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी, तर 22 नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या देशात राहायचे असेल तर ‘वंदे मातरम’ म्हणावेच लागेल, असे विधानही त्यांनी यावेळी केले. वाचा सविस्तर
Source link