Headlines

साखरेचे दर का वाढले?:साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने दरवाढ, माजी साखर आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती




राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात साखरेचा दर 80 रुपये प्रति किलो, तर घाऊक बाजारात सुमारे 7500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. देशात दरवर्षी 285 लाख टन साखरेची आवश्यकता असते, मात्र साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. याविषयी माहिती देताना माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले की, गेल्या दोन वर्षांत उसाखालील क्षेत्र आणि पर्यायाने उसाचे उत्पादन घटले असून, देशात 2024-25 मध्ये 259 लाख टन आणि 2025-26 मध्ये 274 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. शेखर गायकवाड म्हणाले, भारताची लोकसंख्या आणि वाढीचा वेग विचारात घेतला तर आपल्याला 285 लाख टन साखरेची आवश्यकता असते. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होणे हे पहिले कारण आहे. दुसरे महत्त्वाचे कारण इथेनॉलसाठी अगोदारच्या वर्षी 50 लाख टन ऊस वापरण्यात आला. या वर्षी 35 लाख टन इथेनॉलसाठी डायव्हर्ट करण्यात आला. कारखान्यांना इथेनॉलचे पेमेंट दर 21 दिवसांनी मिळत होते हा फायदा होता. शेतकरी संघटनांचा दबाव आणि हे सगळे विचारात घेता भारत सरकारने साखर कारखान्यांना साखर उत्पादित करण्याऐवजी इथेनॉल उत्पादित करा, असे सांगितले आहे. आता याचा परिणाम असा झाला आहे की साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमआय झाले, इथेनॉल जास्त निर्माण झाले आणि आता इथेनॉल पडून आहे, असे चित्र आहे. याचा बॅलेन्स करण्याच्या प्रक्रियेत हा प्रश्न निर्माण झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. सहकार मंत्री काय म्हणाले? राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, साखरेचे कारण एक आहे कारण गतवर्षी साखरेचे उत्पादन कमी झाले होते. पुरवठा तसा भाव असे मार्केटचे चलन असते. एफआरपी आणि इतर कारणांसाठी 80 ते 90 टक्के साखर विकून टाकलेली आहे. साखर उत्पादित व्हायला वेळ लागेल. उत्पादन कमआय होईल अशी शक्यता असल्याने दर वाढलेले आहेत. साखरेचे दर सारखे राहू शकत नाहीत, असे पाटील यांनी म्हटले. पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना एफआरपी वेळेवर द्यावे लागेल, चांगला भाव द्यावा लागणार होता. आम्ही या संदर्भात केंद्रात प्रेझेंटेशन दिले होते. एमएसपी आणि एफआरपी यचीह कुठेतरी सांगड घालून शेतकऱ्यांना उत्तम भाव देणे अपेक्षित आहे. इथेनॉलच्या दरासंदर्भात अडचण निर्माण झालेली आहे. ग्रीन बेस इथेनॉलच्या दरात फरक आहेत, त्याच्यात फरक आहे. केंद्रात सरकारकडे त्याचे नियंत्रण आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *