![]()
पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पार्थ पवार यांच्या वरळीतील ‘शुभदा’ निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. त्यात “पक्षातील अंतर्गत
.
राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि जय पवार यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते. आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात बैठकीत विशेष प्रेझेंटेशन सादर करून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटन अधिक आक्रमक करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर झालेल्या तीन तासांच्या भेटीबाबत बैठकीत विचारणा झाली असता ती केवळ कौटुंबिक चर्चा असल्याचे सांगत पार्थ यांनी राजकीय चर्चांना बगल दिली. दुसरीकडे, पक्षात कोणतीही दुफळी नसून या बैठकीशी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा कोणताही संबंध नसल्याचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
समन्वय आणि डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वय साधण्याचा हा प्रयत्न आहे. नाराजी थेट वरिष्ठांकडे मांडावी, जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशी तंबी नेत्यांना देण्यात आली आहे.