Headlines

मुलीवरील अत्याचार प्रकरण; आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी:अल्पवयीन मुलीच्या ‘संमती’ला कायद्यात आधार नाही




१२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने एका आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीच्या संमतीला कायद्यात कोणताही आधार नसतो, असा महत्त्वपूर्ण निकालही न्यायालयाने यावेळी दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमल एस. विठलाणी यांनी शुक्रवारी आरोपी मोहम्मद रशीद ताहीद आलम (३०) याला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५,००० रुपयांचा दंड ठोठावला. आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी विशेष सरकारी वकील रेखा एन. हिवराळे यांनी सात साक्षीदार तपासले. सरकारी पक्षानुसार, २९ जुलै २०२१ रोजी आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ठाणे शहरातील विविध ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवले की, जरी हे संबंध संमतीने प्रस्थापित झाल्यासारखे वाटत असले, तरी पीडितेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने कायद्याच्या दृष्टीने तिच्या संमतीला काहीही अर्थ नाही. जेव्हा पीडितेची तोंडी साक्ष असते आणि त्याला वैद्यकीय पुराव्यांचा भक्कम आधार मिळतो. अपहरण केल्याच्या आरोपातून मात्र मुक्त न्यायालयाने त्याची अपहरणाच्या आरोपांमधून मात्र निर्दोष मुक्तता केली. पीडित मुलगी त्याच्यासोबत स्वतःहून गेली होती, असे न्यायालयाने नमूद केले. याशिवाय, पीडितेला द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी हे प्रकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवण्याची शिफारसही न्यायालयाने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *