![]()
राहुल गांधी महिला आरक्षणाला विरोध करणारे आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरणावर बोलू नये, संसदेत महिला आरक्षणाचा बिल आले तर यांनी त्यासाठी विरोध केला. महिला सक्षमीकरणाला विरोध करण्याचे काम संसदेत राहुल गांधींकडून करण्यात आले आणि दुसरीकडे पैसो की गुंज कार्यक्रमात मात्र महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, जामनेर पॅटर्नचे नाव घेण्यापूर्वी मुंबई मनपामध्ये 25 वर्षे भ्रष्ट्राचाराचा मातोश्री 2 पॅटर्न कसा राबवला. कोणाच्या पैशातून मिशन कसे उभे केले. मातोश्री 2 पॅटर्न अंतर्गत तुम्ही मुंबईला कसे लुटले आणि कंत्राटदारांकडून कसे पैसे घेतले, हे महाराष्ट्राला माहिती आहे. कुंभमेळ्यात हिंदू येणार म्हणून राऊतांच्या पोटात दुखते आहे. हा जर मुल्ला मौलवीचा कार्यक्रम असता तर राऊतांनी पायघड्या घातल्या असत्या. पण हिंदूच्या कुंभमेळ्याला विरोध करता आहात. ही पापं तुम्हाला फेडावी लागतील. तुम्ही कितीही विरोध केला तरी मोठ्या प्रमाणात कुंभमेळा होणार आहे. ..तर प्रियांका गांधींना अध्यक्ष करा नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले पाहिजे. त्यांना बोलू देत नाही, कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाही आणि केवळ महिला सक्षमीकरणाच्या गप्पा पुण्यात येऊन मारत आहात, हा शो पेड होता हे जनतेने पाहिले आहे. काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये किती महिला नेत्यांचा सन्मान राखला हे सांगावे मग महिला सक्षमीकरणावर बोलावे. त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश नवनाथ बन म्हणाले की, अंगणवाडी पोषण आहारमधील घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु कोविड काळात कामगारांना जी खिचडी वाटप करण्यात येत होती त्यामध्ये कोणी घोटाळा केला आहे. त्यामध्ये पैसे खाणारे तुम्ही घोटाळ्याच्या गप्पा करू नये. संदीप देशपांडे यांनी तुम्ही परप्रांतीय कंत्राटदारांना कसे कामे दिली हे सांगितले आहे. महाराष्ट्रातील जनतेने तुमची टराटरा फाडली आहे. जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. यापुढे भाषा सुधारली नाही तर जनता तुम्हाला घरी बसवतील. लाडक्या बहिणींचे शिव्या शाप घेऊ नका नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांचा पैसो की गुंज कार्यक्रमासाठी संगमनेर, कोल्हापूरमधून बस भरुण आणण्यात आल्या हात्या. राऊत सर्वांत मोठे दलाल आहेत ते कधी उबाठा, कधी शरद पवा तर कधी काँग्रेसचे काम करत असतात, तुम्ही पेड वर्कर आहात. काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थीच पुण्यात कार्यक्रमासाठी नेण्यात आले होते. लाडक्या बहिणींना जर तुम्ही हिणवणार असाल तर त्या तुम्हाला चपलीने मारतील. तुम्ही बहिणींचे शिव्या शाप घेऊ नये अन्यथा तुम्हाला उरला सुरला पक्ष बंद करावा लागेल. देवाभाऊंचा जेन झी सोबत आधीपासून संवाद नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे राजकीय भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप बन यांनी केला आहे. देवाभाऊ हे जे झी सोबत आधीपासून संवाद साधत आहे. राऊतांच्या घरी आणि मातोश्रीवर अभिजीत दिपकेचा फोटो लावला आहे. कारण तुम्हाला आता त्यांचाच सहारा आहे. तुमच्याकडून त्यांची पुजा सुरू आहे, तुम्ही त्याला विष्णूचे अवतार म्हणत आहे.
Source link
राहुल गांधी महिला आरक्षणविरोधी, पुण्यात येऊन मारल्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारतात:'मातोश्री 2 पॅटर्न'ने मुंबईला लुटले, नवनाथ बन यांचा ठाकरे अन् काँग्रेसवर घणाघाती हल्ला