Headlines

जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा:29 ऑगस्टला अंतिम भूमिका, त्याआधी सरकारचा डाव पडला तर मुंबईकडे कूच




मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. ओबीसींसाठी काढलेला जीआर लागू करण्यासोबतच आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेस मागे घेण्याची आणि प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. “प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत, त्याआधी सरकारने कोणताही डाव टाकल्यास मुंबईकडे कूच करू, माघार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे म्हणाले की, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र मिळाले पाहिजे नाहीतर 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणारच. नेमक्या मागण्या काय आहेत “58 लाख नोंदी सापडल्या, मग 58 लाख प्रमाणपत्रे पाहिजेत. नुसत्या नोंदी सापडल्याचे नको, कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. ज्यांनी वैधतेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र मिळाले पाहिजे,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ओबीसी आरक्षणासाठी काढण्यात आलेला जीआर लागू करून त्यातील सर्व सवलती मराठा समाजाला मिळाव्यात, अशीही त्यांची मागणी आहे. तसेच आंदोलनकर्त्यांवरील दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय सातारा गॅझेटसंदर्भात जीआर काढून त्याची अंमलबजावणी करावी, सारथीच्या बंद करण्यात आलेल्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांच्या निधी आणि नोकरीसह प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. “ज्या मागण्या मी सरकारकडे दिल्या आहेत, त्या मागण्यांवर मी ठाम आहे. आता मी मागे हटणार नाही. प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. या सर्व विषयांचा आता पूर्णपणे निकाल लावा, काहीही प्रलंबित ठेवू नका,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारच्या कारभारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सरकारला लोक खूप कंटाळले आहेत. शेतकऱ्यांपासून सगळेच सरकारच्या कारभाराला वैतागून गेले आहेत,” असे ते म्हणाले. मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणारच, यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, मुंबईत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने येण्याची शक्यता असताना त्यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली आहे. “आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. संस्कारापासून लांब गेलेलो नाही. ओबीसी आमचाच आहे, तो आल्यावर जाऊ,” असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *