Headlines

Class 10th and 12th are the ‘turning point’ of life for students



मराठा पाटील संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात दहावी-बारावीतील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांकरिता आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो. पुढील आयुष्या

.

अध्यक्षस्थानी जानराव धुमाळे उपस्थित होते. मराठा पाटील संघ बाळापूरच्या वतीने मोखा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. मराठा पाटील संघाचे सचिव मधुसूदन माळी यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. बुरुंगले विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. पराग माळी यांनी दहावीनंतर अभ्यास कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नीट किंवा जेईई उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे लागते, याबाबतही त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमास मोखा परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्यासह नीलेश माळी, डिगांबर काळे, जानराव धुमाळे, उज्वल धुमाळे, रुपेश तायडे, पूनम तायडे, ब्रह्मदेव तायडे, रामदास पाटील वाकडे, गणेश पाटील माळी, उज्वल धुमाळे आदी उपस्थित होते.

समाज विद्यार्थ्यांच्या पाठिशी कार्यक्रमात मराठा पाटील संघ बाळापूरचे अध्यक्ष शरद वानखेडे यांनी प्रामुख्याने मनोगत व्यक्त केले. मराठा पाटील संघातर्फे बाळापूर तालुक्यात मोखा, उरळ, निमकरदा, पारस, कळंबा बुद्रुक, बाळापूर, वाडेगाव व खिरपुरी येथे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा त्यांचा सत्कार करण्याचा मानस वानखडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *