Headlines

विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता अन् विचारशक्ती वापरावी- प्रा. ओक:आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये बालवैज्ञानिकांच्या प्रतिकृतींनी वेधले लक्ष‎




आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे सभागृह विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि त्यांच्या सर्जनशील प्रतिभेने भारून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात एआयवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आणि विचारशक्तीचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन प्रा. नितीन ओक यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे संचालक दिलीपराज गोयनका, प्रा. नितीन ओक, मुख्याध्यापक कुरियचन सी.पी, उपमुख्याध्यापिका श्वेता चोमवाल, मुख्य समन्वयक गुरनीत कौर ओबेरॉय आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. ओक तसेच परीक्षकांचे रोपटे आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. संजय देवडे, डॉ. हरीश मालपानी आणि डॉ. स्वाती झोडपे परीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्तीची प्रशंसा केली. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पालकांनी आपल्या पाल्यांच्या वैज्ञानिक प्रयत्नांचे आणि सर्जनशील कार्याचे कौतुक केले. सूत्रसूत्रसंचालन विद्यार्थिनी लावण्या धावले आणि महक कटारिया यांनी केले. आभार विज्ञान विभाग प्रमुख दुर्गा पाठक यांनी मानले. मंदार जोशी, मीनल कडू, जय पाटणे, श्रद्धा गिरी, सोनल पसारी, प्रांजली देशमुख, रीना गुप्ता, क्रीडा शिक्षक पंकज कोकाटे, भूषण पाटील यांनी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेने उपयुक्त वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या. यात हायड्रो इलेक्ट्रिसिटी, मिनी हेलिकॉप्टर, बझी गेम, ड्रोन, स्केलेटन सिस्टम, अर्थक्वेक अलार्म सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टम, ओशन अँड सी क्लिनिंग बोट, आदित्य एल-१, हायड्रॉलिक ब्रिज, स्मार्ट क्रॉप प्रोटेक्शन सिस्टम, प्रिव्हेंटिंग ट्रेन अॅक्सिडेंट, न्यूटन पेंडुलम, फार्म एक्स रोबो, प्लाझ्मा गन, बॉर्डर सिक्युरिटी सिस्टम आणि स्मार्ट इरिगेशन सिस्टम या मॉडेल्सनी विशेष लक्ष वेधून घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *