Headlines

Mahayuti Internal Rift; Shashikant Shinde Slams CM Eknath Shinde & Govt


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे त्यांची सरकारवर, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही मला दिलेले आश्वासन पाळले नाही, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. यानं

.

शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये अजिबात एकवाक्यता नाही हे चित्र सातत्याने स्पष्ट होत आहे. नुकताच असा एक निर्णय घेण्यात आला की, मुख्यमंत्री इतर मंत्र्यांचे निर्णय बदलू शकतात. यातून ‘मुख्यमंत्री हेच बॉस आहेत’ हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. महायुतीत अंतर्गत विषयांवर मोठी नाराजी आहे. एकनाथ शिंदेंना आपणच मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. याच वैचारिक मतभेदांमुळे आणि नाराजीमुळे महायुतीला बैठका घ्याव्या लागत आहेत.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

अमरावती येथील रुग्णालयातील दुर्घटनेबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, या घटनेत जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. केवळ रुग्णालयाला जबाबदार धरून चालणार नाही. सरकारने सुरक्षेच्या मोठ्या घोषणा केलेल्या असताना अमरावतीत ही दुर्दैवी घटना घडतेच कशी? यावरून सरकारचे दावे केवळ कागदावरच असल्याचे सिद्ध होते.

‘बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली’ काढणार

शशिकांत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात उत्तम काम सुरू असल्याचा दावा सरकार करत आहे, मात्र प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला रोजगार नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेचा ‘पॅकेज’च्या नावाखाली गैरवापर केला जात आहे. कामगार कायद्यांमधील बदलांमुळे कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात येत्या 27 तारखेला आम्ही विभागवार आंदोलने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, तसेच ‘बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली’ काढणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

स्मार्ट मीटरला आमचा विरोध

शशिकांत शिंदे म्हणाले की, स्मार्ट मीटरबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी कोणावरही सक्ती करणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु, आता प्रत्येकाला स्मार्ट मीटर बसवण्याचे टार्गेट दिले जात आहे. स्मार्ट मीटरमुळे बिल प्रचंड येते, हा जनतेचा संशय दूर करण्यासाठी सरकारने बैठका घ्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. या मीटरला आमचा तीव्र विरोध आहे.

..तर महायुतीचे सरकार आलेच नसते

शशिकांत शिंदे म्हणाले की, आमचे खासदार सत्ताधाऱ्यांना कामाच्या निमित्ताने भेटतात. मात्र, यावरून संशय घेतला जाऊ नये. 2014 मध्ये असा संशय घेतला गेला नसता, तर आज भाजपचे सरकार आलेच नसते. आम्ही सर्वजण मविआ म्हणूनच एकजुटीने काम करत आहोत. हे ही वृत्त वाचा सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.