![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र राजभवनाच्या (लोकभवन) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवा’चे यजमानपद पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले आहे. गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी या विद्यापीठाला प्रथमच मिळाली आहे. येत्या 16 ते 19 जानेवारी 2027 दरम्यान हा भव्य महोत्सव रंगणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 26 विद्यापीठांमधील सुमारे 1,500 नवसंशोधक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी अधिकृत माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली. कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेने घोषणा विद्यार्थ्यांमधील नावीन्यपूर्ण संशोधन, कल्पकता आणि नवोन्मेष वृत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी 2006 मध्ये ‘आविष्कार’ स्पर्धेची सुरुवात केली होती. या संदर्भात 2 जुलै 2026 रोजी राजभवनात राज्यातील सर्व विद्यापीठांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यजमानपदाचा प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यजमान विद्यापीठ म्हणून मराठवाडा विद्यापीठाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 26 विद्यापीठे, 3 स्तर आणि 6 मुख्य गट या राज्यस्तरीय स्पर्धेचे स्वरूप अत्यंत व्यापक असणार आहे: तीन स्तर: सहा ज्ञानशाखा (गट): जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे वेध:राज्यस्तरीय स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
Source link
'बामू'ला पहिल्यांदाच 'आविष्कार'चे यजमानपद:संभाजीनगरातील महोत्सवात 26 युनिव्हर्सिटीतील दीड हजार विद्यार्थी लावणार हजेरी