![]()
राज्यात ऑटोरिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करताना प्रशासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवावा, अशी आग्रही मागणी माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. ज्या अमराठी रिक्षाचालकांना अद्याप मराठी भाषा शिकता आलेली नाही, त्यांचे परवाने रद्द न करता त्यांना आणखी मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदन त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे. निवेदनात संजय निरुपम यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 85 टक्के रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकून आत्मसातही केली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र, उरलेल्या अल्पसंख्याक रिक्षाचालकांवर मुदत संपल्यानंतर रेड पथकांद्वारे कारवाई करणे आणि परवाने रद्द करण्याच्या नोटीसा देणे चुकीचे आहे.” प्रमुख मागण्या मराठीचा सन्मान जपतानाच गरिबांची रोजीरोटी वाचवणे हेच पुरोगामी महाराष्ट्राच्या संवेदनशील शासनाचे लक्षण ठरेल, त्यामुळे या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे.
Source link
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना रद्द करू नका:शिवसेना नेते संजय निरुपम यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी