Headlines

कुर्डुवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यानाची झाली दुरवस्था:जुनी खेळणी हटवली, नवीन खेळणी अद्याप बसवली नाहीत; कामावर प्रश्नचिन्ह‎



लहान मुलांच्या किलबिलाटाने आणि आनंदी हास्याने गजबजणारे कुर्डुवाडी शहरातील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यान आज प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाअभावी भकास झाले आहे. शहरातील लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्यांची सुविधा जवळपास उपलब्ध नसल्याने ब

.

जानेवारी २०२१ मध्ये उद्यानाच्या कायापालटासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. या कामामध्ये संरक्षण भिंतीची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सुशोभीकरणासाठी झाडे लावणे, संदेश भिंती तयार करणे, अत्याधुनिक शौचालय व वॉचमन रूम उभारणे तसेच नवीन खेळणी बसविणे आदी कामांचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात नूतनीकरणाच्या नावाखाली जुनी खेळणी काढून टाकण्यात आली आणि त्यानंतर नवीन खेळणी बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उद्यानाचा कायापालट होण्याऐवजी त्याची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मोठ्या निधीची तरतूद होऊनही प्रत्यक्षात मुलांसाठी सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एक कोटी रुपयांच्या टेंडरमधील कामांची सद्यस्थिती काय आहे? किती निधी खर्च झाला? कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती प्रलंबित आहेत? याबाबत नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *