![]()
अमित शहा हे गृहखाते चालवत नसून एखाद्या गुंडा प्रमाणे वर्दीतील लोकांची टोळी चालवतात असे त्यांच्या विषयी बोलले जाते. या सर्वांचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला हे मोदी यांना पटते आहे. कॅबिनेट बदलात जो पर्यंत अमित शहांना बदलले जात नाही तो पर्यंत काही अर्थ नाही, अशी चर्चा दिल्लीतील वर्तुळात सुरू आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबरदस्तीने तिथे लादले जात आहे. कारण भाजपकडे पंतप्रधानपदासाठी दुसरा चेहरा नाही आणि जे चेहरे आहेत ते विद्रुप आहेत. अमित शहा यांची कितीही इच्छा असली त्यांनी मोदीविरोधात आपली कितीही खासदारांची गँग निर्माण केली तरीही त्यांना कोणी पंतप्रधान बनवणार नाही. रा.स्व.संघामध्ये देशाच्या नेतृत्व बदलाबद्दल चर्चा सुरू आहे. फडणवीसांना केंद्रात जावेच लागणार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जावे लागणारच आहे. त्यांना पक्ष आणि केंद्रातील जवाबदारी घ्यावीच लागणार आहे. अमित शहा यांच्यासोबत कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही. ही भाजप नेत्यांनी भूमिका घेतली आहे, मी खोटे बोलत नाही, माझ्याकडे पक्की माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांनी शहासोबत काम करण्यास तयार नाही. मोदींना सुद्धा अमित शहा यांच्यासोबत काम करायचे नाही त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशी मोदींची मानसिकता आहे. मोदी यांची प्रकृती बरी नाही संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर दबाव निर्माण केला आहे. सरकारच्या अपयशाची लक्तर टांगली गेल्याने त्यांना कॅबिनेटमध्ये मोठे बदल करावे लागत आहेत. पण विद्रुप मुंडके ठेवत बाकी बदल करण्याचा काही फायदा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरली असून शहांना प्रतिमाच राहिलेली नाही. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 99 टक्के मंत्री हे अकार्यक्षम आहेत. भाजपमध्ये एखादा दुसरा नेता सोडला तर केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे दुसरे नेते नाहीत. शिवराजसिंह चव्हाण, नितीन गडकरी सोडले तर सर्व काही रामभरोसे चालले आहे. मोदी यांची प्रकृती बरी नाही असे माझे म्हणणे आहे.
राष्ट्रहितासाठी मोदी-शहांनी सत्तेपासून दूर व्हावे संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप मागे सोडून पुढे गेले आहे. मोदी या क्षणी सत्तेवर नसतील तेव्हा ते नसतील पण राहुल गांधी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. मोदी यांची प्रकृती बरी नाही, नेहरु जसे थकले होते तसे मोदी हे आता थकले आहेत. राष्ट्रहितासाठी मोदी-शहांनी सत्तेपासून दूर होत मार्गदर्शकाचे काम केले पाहिजे, यालाच देशसेवा म्हणतात. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसणे राष्टहित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची खिल्ली उडवली जाते. त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, झोप न येणं गंभीर आजाराचे रक्षण आहे. चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही हे मानसिक आजाराचे लक्षण आहे. आमच्यामुळेच सीजेपीला बळ मिळाले संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीला चांगले भविष्य आहे. आम्ही जेन झीच्या मागे उभे राहिलो म्हणून सीजेपीला बळ मिळाले आहे. याचा फायदा इंडिया आघाडी आणि मविआलाच होणार आहे.
हे ही वृत्त वाचा MPSC ची औषध निरीक्षक परीक्षा अखेर रद्द:पेपर 40 लाखांना विकला, अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार आक्रमक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच विद्यार्थ्याकडे होता हे दिलेले स्पष्टीकरण अजिबात पटण्यासारखे नाही, असा थेट निशाणा पवार यांनी साधला आहे. वाचा सविस्तर
Source link