पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती कशी आहे, हे संपूर्ण देश बघतो आहे; ते आजही 18 तास काम करतात. संजय राऊतांनी मेडिकल बुलेटिन काढून उद्धव ठाकरेंची प्रकृती कशी आहे, हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. उद्धव ठाकरेंना मंचावर उठून उभे राहण्यासाठी दोन माणसा
.
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये अमित शहा आहेत. परंतु संजय राऊत हे राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाच्या ‘गुडबुक’मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राऊत आणि उद्धव ठाकरेंसह राहुल गांधी हे सर्वजन जनतेच्या ‘बॅडबुक’मध्ये गेले आहेत.
भाजपचे नेतृत्व सक्षम
नवनाथ बन म्हणाले की, भाजप देशाचे नेतृत्व तयार करण्यासाठी अतिशय सक्षम आहे. उद्धव ठाकरेंनंतर पक्षाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार की संजय राऊत, याचा विचार राऊतांनी आधी करावा. आम्ही पक्ष फोडण्याचे काम करत नाही, उलट विचार फोडण्याचे काम ‘उबाठा’ गटाकडून सुरू आहे. आम्ही राष्ट्रहितासाठीच काम करतो, पण राऊत हे पाकिस्तानच्या हिताचे काम करत आहेत. राऊत हे औरंगजेब आणि बाबराच्या भरवशावर काम करत असून, महाराष्ट्रात अशा हिंदूविरोधी विचारांची कबर खोदल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

..म्हणून राऊतांनी गांधींची भेट घेतली
नवनाथ बन म्हणाले की, येत्या दोन वर्षांमध्ये संजय राऊत ‘उबाठा’ गट संपवून तो काँग्रेसमध्ये विलीन करायला लावणार आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी ठरलेल्या 10 हजार कोटी रुपयांपैकी 1 हजार कोटी रुपयांचा हप्ता मला द्यावा, या विषयावर संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून त्यांच्यात याच विषयावर चर्चा झाली आहे. हे पैसे कसे स्वीकारायचे, याचीही चर्चा झाली; तसेच ‘येणाऱ्या काळात मी केवळ राहुल गांधी यांचेच कौतुक करेन,’ असे आश्वासनही राऊतांनी त्यांना दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधींकडे इंडिया आघाडीचेही नेतृत्व नाही
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नेते आहेत, तर राहुल गांधी हे ‘इंडिया’ आघाडीचे मुख्य नेतेही बनू शकलेले नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने तुमचे आणि काँग्रेसचे अपयश चव्हाट्यावर आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे, हे जनतेला ठाऊक आहे; म्हणूनच जनतेने सलग तीन वेळा त्यांना निवडून दिले आहे. राहुल गांधी यांना तीन निवडणुकांमध्ये मिळून जेवढे खासदार निवडून आणता आले नाहीत, त्यापेक्षा जास्त खासदार भाजप एकाच निवडणुकीत निवडून आणते. त्यामुळे अपयशाची भाषा तुम्ही करू नये.
ठाकरेंचे हात कसे कापत होते?
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे हात कोरोनाच्या काळात कसे कापत होते? ‘केंद्रीय मंत्री अकार्यक्षम आहेत’ असे म्हणणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. तुमचा पक्ष आता उरणपर्यंतही उरलेला नाही. उद्धव ठाकरे आणि राऊत यांना 100 वर्ष आयुष्य मिळो, जेणेकरून त्यांना स्वतःच्या पक्षाची वाताहात पाहता येईल, असा टोला त्यांनी लगावला. एनडीएने अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची झोप उडवली आहे. राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान होणार नाहीत, याची खात्री पटल्यामुळेच राऊतांची झोप उडाली आहे, असेही बन म्हणाले. हे ही वृत्त वाचा शहा गृहखाते नाही, तर वर्दीतील लोकांची टोळी चालवतात:मोदींना त्यांच्यासोबत काम करायचे नाही, पंतप्रधान थकले- संजय राऊत

अमित शहा हे गृहखाते चालवत नसून एखाद्या गुंडा प्रमाणे वर्दीतील लोकांची टोळी चालवतात असे त्यांच्या विषयी बोलले जाते. या सर्वांचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला हे मोदी यांना पटते आहे. कॅबिनेट बदलात जो पर्यंत अमित शहांना बदलले जात नाही तो पर्यंत काही अर्थ नाही, अशी चर्चा दिल्लीतील वर्तुळात सुरू आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर