Headlines

'तुमची रेल्वे फिरू देणार नाही, विमानही उडू देणार':मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; मुंबईत आंदोलन बंदीवरून केला हल्लाबोल




मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा करत वेळ पडल्यास पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईत इतरत्र कुठेही आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई करणारे नवे नियम लागू केले आहेत. मात्र मराठा समाज मुंबईत धडकणार असल्यामुळेच सरकारने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी या नव्या नियमांवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठे मुंबईत जाणार आहे, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केले, यात झाकून ठेवण्यासारखे काहीच नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे म्हणाले, सरकार विरोधात जात आहे, लोकांनी यांना सत्तेवर बसवले, मराठ्यांनी यांना सत्तेवर बसवले. मात्र, त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोहणे म्हणजे विरोध वाढवण्याचे कारण फक्त सरकार आहे. कायदा तुमच्या हातात आम्ही देतो, सत्ता आम्ही तुमच्या हातात देतो आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता. लोक यासाठी तुम्हाला निवडून देतात का? आपण कसल्याही परिस्थितीत मुंबईला जरी गेलो, तरी आपले सरकार तिथे आहे. आपले फडणवीस, आपले शिंदे, आपले दादा तिथे बसले आहेत. जे आपले म्हणून बसवले तेच मुंबईत येऊ नका म्हणतात, ही खूप मोठी दहशत झाली. ही सरकारची दादागिरी झाली, ही चालत नसते, असे जरांगे यांनी म्हटले आहे. विरोध केला तर रेल्वे फिरू देणार नाही, विमानही उडू देणार नाही पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्यापुढे दादागिरी करायची नाही. मग आम्ही मुंबईत सगळीकडे आंदोलन करत असतो, विरोध केला तर रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमाने उडू देणार नाही. आम्ही कोणाला मोजत नसतो आणि ऐकतही नसतो. आम्ही कायद्याला सन्मान करतो, आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ. मी जात असतो, आमचे जायदे ठरले तर मी जाणार, रात्रंदिवस बसणार. तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार. तुम्ही मुंबईत कसे आडवतात हे पण बघतो, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जर ठरले तर मुंबईत येणार, वर्षावरच येणार तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही तर सत्तेतही बसायचे नाही. मुंबईतील बांधवांनी समजून घ्यावे, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? एखाद्या वेळेस नक्की होईल. मात्र, आम्हाला दहा-पंधरा दिवस सांभाळून घ्या, आम्ही तुमचेच आहोत, लोकाचे नाही. मुंबईत कोणीच सुखी नाही, आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जर ठरले तर मुंबईत येणार, वर्षावरच येणार, तुमच्या बापाची पेंड आहे का? इकडे येऊ नको, तिकडे येऊ नको म्हणायला, असे म्हणत जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *